शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या सोडवाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:17 IST

लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : धमदीटोला येथे धुर्व गोंड समाजाचा आदर्श सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील धमदीटोला येथे अमित विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि.२८) आदिवासी बहुउद्देशिय धुर्व गोंड समाज संस्थेच्या वतीने आदिवासी धुर्व गोंड समाजाचा आदर्श सामूहिक विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांच्या हस्ते, धमदागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सदस्य गणेश तोफे, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, ओरडबांध महासभेचे प्रवक्ता प्रेमदास पंधरे, महामंत्री उत्तम मरकाम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश राऊत, माजी सभापती देवकी मरई, वसंत पुराम, काँग्रेस कार्यकर्ते छगनलाल मुंगनवार उपस्थित होते.कोरोटे पुढे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांचे व त्यांच्या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याकरिता शासनाने विविध लोकसभा व विधानसभा क्षेत्र त्या-त्या समाजाकरिता आरक्षित ठेवले आहे. त्या क्षेत्रातून खासदार व आमदार निवडून येतात. मात्र ते लोकसभा किंवा विधानसभेत जेथे लोकांच्या हितार्थ कायदा आणि निर्णय घेतले जातात तेथे त्यावेळी त्या कायदा व निर्णयाचा विरोध करीत नाही. मात्र तो कायदा किंवा निर्णय तयार झाल्यानंतर त्या खात्यातील मंत्र्यांना तो कायदा किंवा निर्णय मागे घेण्यासंबंधात निवेदन देतात. ही त्या लोकप्रतिनिधींची शोकांतिका आहे. असे न करता ज्यावेळी शासन लोकांच्या विरुद्ध कायदा किंवा निर्णय घेते त्याचवेळी विरोध करुन असा निर्णय किंवा कायदा तयार करण्यास रोखू शकेल तोच खरा लोकप्रतिनिधी म्हणता येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा कमिटी सदस्य सोनू नेताम यांनी मांडले.संचालन पंचराम मडावी यांनी केले. आभार किशोर नेताम यांनी मानले. या वेळी परिसरातील महिला, पुरुष व युवा वर्ग तसेच वºहाडी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.१० जोडपी परिणयबद्धसदर विवाह सोहळ्यात आदिवासी समाजातील एकूण १० जोडप्यांना सामूहिकरित्या परिणयबद्ध करण्यात आले. या वेळी उपस्थित पाहुण्यांनी सर्व जोडप्यांना भेटवस्तू व आशीर्वाद दिला.