प्रचार : जनसंपर्क अभियानातून घातली सादगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस-पीरिपा युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी क्षेत्राच्या ग्रामीण भागात दौरा करून नागरिकांशी जनसंपर्क साधला. यावेळी त्यांनी ग्राम नवाटोला, लोधीटोला, घिवारी, गोंडीटोला, माकडी, तेढवा, डांगोरली येथे नागरिकांच्या भेटी घेवून केवळ विकासाच्या नावावर विवेकाने निर्णय घ्यावे व पंजा चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सभांना संबोधित करताना ते म्हणाले की, निवडणूक तर एक बहाना आहे, नागरिकांसह त्यांचे संकर्प नेहमीच असतात. आमदार या नात्याने सामान्य जनतेच्या मध्ये राहणे त्यांचे कर्तव्य असून ही गोष्ट ते अनेक वर्षांपासून निभवित आहेत. वर्षांपासून विकासाच्या बाबत उपेक्षित गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कार्यांची एक नवीन हवा सुरू आहे व गावागावात विकास कार्ये पोहचत आहेत. प्रथमच नागरिकांनी एका आमदाराला जनहिताचे कार्य करताना पाहिले आहे. गावा-गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या जवाहर विहिरींचा मंजुरीचा विषय असो, गरजूूंना घरकूल देण्याची बाब असो किंवा निराधारांना व्यक्तिगत लाभदायी योजनांचा लाभ देण्याचा विषय असो. आम्ही शासनासमोर पुरजोरपणे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिक विकासाचा एक स्पंदन अनुभवत आहेत. कोणत्याही उमेदवाराजवळ गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या विकासाची कोणतीही योजना नाही. ते केवळ गोरेगावातून निवडणूक लढण्यासाठी आले आहेत व १५ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता गोरेगावला परत जातील. जर नागरिकांनी जातीपातीच्या वर जावून विकासाच्या नावावर मत देण्याची नवीन परंपरा स्थापित केली तर निश्चितच संपूर्ण क्षेत्रात विकासाची एक नवी लाट आणण्यात आम्ही कसलीही कमतरता ठेवणार नाही, असे ते म्हणाले.यावेळी जि.प. सदस्य रूद्रसेन खांडेकर म्हणाले की, १९४७ पासून आतापर्यंत ६७ वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात अनेक आमदार, खासदार पाहण्यात आले. परंतु जे संबंध गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसह अग्रवाल यांनी निभविले, तसे संबंध अद्यापही कोणताही लोकप्रतिनिधी बनवू शकले नाही. भाजपच्या बहकाव्यात येवून ही संधी गमावली तर लहानसहान दैैनंदिन अडचणींसाठी ५० किमी दूर गोरेगाव तालुक्यात चोपा येथे जावे लागेल. त्यासाठी क्षेत्रातील लोकांमध्ये राहणारे गोपालदास अग्रवाल यांना विजयी करा असे ते म्हणाले.सदर पदयात्रेत जि.प. सदस्य रूद्रसेन खांडेकर, पं.स. सदस्य विद्या भालाधरे, माकडीचे सरपंच ठाकरे, सेंट्रल कृषक सेवा सहकारी संचालक मंगल ठाकरे, धीरज नशिने, विक्की बघेले, बलमाटोलाचे उपसरपंच मेश्राम, मंगल कोल्हे, दिनेश बोपचे, मनिराज गराडे, घिवारीचे सरपंच रणगिरे, डॉ. चैनलाल रणगिरे, राजेश ठाकरे, डॉ. रहांगडाले, प्रकाश तांडेकर, मदन लिल्हारे, ओम रहांगडालेसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विकासाच्या नावावरच जनतेची मते मागणार
By admin | Updated: October 9, 2014 23:05 IST