शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

लोकअदालतीत सुटले ११७७ तंटे

By admin | Updated: December 14, 2015 02:16 IST

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाद्वारे राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी घेण्यात आली.

नरेश रहिले गोंदियाराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाद्वारे राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी घेण्यात आली. या अदालतीत गोंदिया जिल्ह्यातील सहा न्यायालयांनी घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ११७७ प्रकरणे एकाच दिवश निकाली काढण्यात आली. जिल्हाभरात सर्वच प्रकारची ७ हजार २१ प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. गोंदिया जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील तालुका न्यायालयांनी तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा निपटारा केला. या राष्ट्रीय लोक अदालतीत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, देना बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, जोतिबा फुले बिगर शेती सहकारी पतसंस्था यांची पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणे होती. तसेच न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सडक-अर्जुनी न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ३४० प्रकरण ठेवले होते. त्यातून २० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून २ लाख २६ हजार ४७२ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्यायप्रविष्ट १२८ प्रकरण ठेवले होते त्यातून ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व १८०० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. अर्जुनी-मोरगाव न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ५७९ प्रकरणे ठेवले होते. त्यातून ३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून ३ लाख ६८ हजार ९१० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. तर न्यायप्रविष्ट १२९ प्रकरणे ठेवले होते त्यातून ४८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून सहा हजार ६०० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. तिरोडा न्यायालयात पूर्व न्यायप्रविष्ट ४५४ प्रकरणे ठेवले होते. त्यातून १८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून सात लाख ७४ हजार ३७० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ४५२ प्रकरणे ठेवले होते त्यातून २९२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून २ लाख ३८ हजार ९४ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. आमगाव न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ८४२ प्रकरणे ठेवले होते. त्यातून २३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून २७ लाख ५४ हजार ९५८ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्यायप्रविष्ट १८२ प्रकरणे ठेवले होते त्यातून ६२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून तीन हजार ५० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. देवरी न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट १२८८ प्रकरणे ठेवले होते. त्यातून सहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून तीन लाख १९ हजार ४६३ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ११९ प्रकरणे ठेवले होते त्यातून ७४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून दोन लाख रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. गोंदिया न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट १५४३ प्रकरणे ठेवले होते. त्यातून ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. असून तडजोडीतून १७ लाख २० हजार ९७६ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ९४४ प्रकरणे ठेवले होते त्यातून ४३० प्रकरणांचा निपटारा करून त्यातून २ लाख ९० हजार ८३९ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. गोंदिया जिल्ह्यात एकूण सात हजार २१ प्रकरण दाखल करण्यात आले. यातील ११७७ प्रकरणाचा निपटारा करून ६९ लाख ५९ हजार ५३२ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरवून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. लोकअदालतीत तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनीही सहकार्य केले.वैवाहिकांची २० प्रकरणे निकालीपती-पत्नीचे अनेक प्रकरण या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. यातील २० प्रकरण सुटले आहेत. तिरोडा न्यायालयाने सात प्रकरण दाखल केले असून एका प्रकरणाचा निपटारा झाला. गोंदियाने ८० प्रकरण ठेवले होते यातील सात प्रकरणांचा निपटारा झाला. आमगाव न्यायालयाने ५४ प्रकरणे ठेवले होते. त्यातील नऊ प्रकरणांचा निपटारा झाला. सडक-अर्जुनीने सहा प्रकरण ठेवले होते परंतु निपटारा होऊ शकला नाही. अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने १६ प्रकरण ठेवले होते त्यातील तीन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. देवरी न्यायलयाने एकही प्रकरण या प्रकारचे ठेवले नव्हते.१० पॅनल मध्ये हे होते न्यायाधीशप्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या अदालतीत गोंदियात पाच पॅनल तर प्रत्येक तालुकास्तरावर एक पॅनल होती. गोंदिया येथील पॅनलमध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सी.पी. चौधरी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एच. खरवडे, ईशरत शेख/नाजीर, पी.बी. भोसले, ए.बी.तहसीलदार, आमगावचे ए.डी. रामटेके, आर.के. पुरोहीत, तिरोडाचे आर.एस. पाजणकर,एस.डी. सावरकर, देवरीचे एस.जे. भट्टाचार्य, सडक-अर्जुनीचे व्ही.ए.साठे, अर्जुनी-मोरगाव येथे बी.एम. कार्लेकर, कामगार न्यायालयात मेश्राम, सहायक धर्मादाय आयुक्त रेहपाडे यांचा समावेश होता.