शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून वेतन प्रलंबित

By admin | Updated: August 6, 2015 00:51 IST

आंग्ल व आयुर्वेदिक दवाखाने या योजनेतील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

अर्जुनी मोरगाव : आंग्ल व आयुर्वेदिक दवाखाने या योजनेतील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून उपासमारीचे संकट उद्भवले आहे. प्राप्त माहितीनुसार, आंग्ल दवाखाने या योजनेत जिल्ह्यात तीन दवाखाने आहेत. येथे वैद्यकीय अधिकारी, औषध वितरक व परिचर असे तीन पदे मंज़ूर आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच जिल्ह्यात आयुर्वेदिक दवाखान्यांची संख्या २६ आहे. येथे प्रत्येकी दोन पदे मंजूर आहेत. असे एकूण ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. या दोन्ही योजनेतील जिल्ह्यातील ६१ कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. सध्या कर्मचाऱ्यांची आॅनलाईन वेतनप्रणाली सुरू आहे. या योजनेतील पदे अजूनही शासन स्तरावरुन मंजूर नसल्याने वेतन देण्यात दिरंगाई होत असल्याचे समजते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना ही अडचण माहिती असूनही गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट उद्भवले आहे. चौकशी केली असता थातुरमातूर उत्तर दिले जाते. सध्या शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांची मुले ही बाहेरगावी शिक्षण घेतात. पगार नसल्याने आधीच घरात उपासमार सुरू आहे. मुलांना पाठविण्यासाठी पैसे कुठून आणणार? पाच महिन्यांची उसनवार वाढल्याने कर्ज देणारे, व्यापारी हे पैशाची मागणी करतात. या दृष्टचक्रात हे कर्मचारी अडकले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेच नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. (तालुका प्रतिनिधी)बांगड्यांचे वितरण आज व उद्यागोंदिया : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना देण्यात येणारे गोल्ड प्लेटेड बँगल्सचा वितरण सोहळा ६ आणि ७ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. सोबतच ज्योतिषांचा मोफत सल्लासुद्धा देण्यात येणार आहे. सदर सोहळा लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी दीपा भौमिक यांच्याशी (9423689664) संपर्क साधावा.