शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

क्लेरियन कारखान्यात कामगारांचे प्रश्न प्रलंबित

By admin | Updated: September 9, 2015 01:54 IST

क्लेरीयन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यात सुमारे १५० कुशल-अकुशल कामगार कार्यरत आहेत.

सोयी-सुविधांचा अभाव : राष्ट्रीय मजदूर मंचाची तक्रार तुमसर : क्लेरीयन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यात सुमारे १५० कुशल-अकुशल कामगार कार्यरत आहेत. २१ वर्षे जुन्या कारखान्यात शासकीय नियमानुसार वेतनात विसंगती दिसून येते. येथे सोयी सुविधा व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. १५ आॅगस्टला या कारखान्यातील एका कामगाराचा सुरक्षेच्या अभावी मृत्यू झाला होता. औद्योगिक नियोजन स्थायी आदेश १९४६ व बी.आय. आर.एक्ट १९५९ अंतर्गत सक्षम अधिकृत अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करण्यात आले नाही, अशी तक्रार राष्ट्रीय मजदूर, मंच तुमसर यांनी केली आहे.तुमसर रोड येथे क्लेरियन औषध निर्माण करणाऱ्या कारखान्याची स्थापना सन १९९४ मध्ये करण्यात आली. येथे सुपारे १५० स्थायी व अस्थायी कामगार कार्यरत आहेत. वेतन व अन्य सुविधांचा येथे अभाव आहे. १५ वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रतिमाह मुळ वेतन व डी.ए. मिळून १७ हजार रुपये कुशल कामगारांना देणे, १० वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना मूळ वेतन महागाई भत्यासोबत १६ हजार रुपये देणे, १ ते ५ वर्ष सेवा दिलेल्या अकुशल कामगारांना मुळ वेतन, महागाई भत्ता जोडून १५ हजार रुपये देणे, नियुक्ती पत्र कामगारांना देणे, एक वर्ष झालेल्या कामगारांना कायम नियुक्ती पत्र देणे, वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून देणे, एका वर्षात आठ सुट्ट्या देणे, आसस्मीक सुट्टया १२ देणे, वेतन रजा कारखाना अधिनियमानुसार देणे, आजारी रजा १० दिवस देणे, अतिरिक्त कामाचा मोबदला वेतनासोबत देणे, वेतनाची स्लिप कामगारांना देणे, भविष्य निधीची स्लिप देणे, कामगारांच्या सुरक्षतेकरिता जोडे, हातमोजे, चष्मा, उत्तम दर्जाचे मॉस्क देणे, कारखान्याचे ओळखपत्र देणे, नवीन नियुक्ती कामगाराला ३२५० रुपये व एका वर्षानंतर ६१५० रुपये देणे, कामगारांच्या ग्रेड नुसार वेतन देणे, कामगारंना सन २०१४-२०१५ दिवाळी बोनस, २० टक्के देणे, पूर्ण वेतनाच्या १० टक्के घरभाडे भत्ता देणे, कामगारांना महिन्याला १० लिटर पेट्रोल ये-जा करिता देणे, रात्रपाळी, कामगारांना २० रुपये अतिरिक्त देणे, कापड धुणे महिन्याला १०० रुपये देणे, उपाहारगृह प्रति महिना १०० रुपये देणे, यात्रा भत्ता चार वर्षातून एकदा पूर्ण वेतन देणे आदी जम्बो मागण्यांचा समावेश आहे. कारखाना अधिनियम १९४८ अंतर्गत कलम ४२ ते ५० पर्यंत पालन करण्याची मागणी केली आहे.कामगारांच्या आरोग्य सोयी सुविधेकरिता येथे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एप्रिल १९९४ मध्ये क्लेरियन कारखाना सुरु झाला होता. परंतु प्रबंधकांनी कामगारांच्या हिताकडे औद्योगिक नियोजन स्थायी आदेश १९४६ तथा बी.आय.आर.एक्ट १९५९ अंतर्गत सक्षम अधिकारी प्रमाणित केली नाही. १५ आॅगस्टला कामगार सुनील चौधरी यांचा कारखान्यात कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता. सुरक्षा साहित्याअभावी त्याचा मृत्यू झाला होता. चौधरी यांच्या कुटुंबीयातील एकाला कारखान्यात स्थायी नोकरी देऊन सेवानिवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर मंच तुमसरचे अध्यक्ष हरिहर मलिक यांनी केली आहे. २१ वर्षापासून या कारखान्यात वेतन, मूलभूत सोयी-सुविधा, कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आहे. ढीगभर अधिकारी यांची फौज असतांनी काय निरिक्षण करतात, हा संशोधनाचा भाग आहे. एक कामगार संघटना संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)