शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२३.१५ कोटींचे चुकारे प्रलंबित

By admin | Updated: July 3, 2015 02:03 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आपल्या ४७ व आदिवासी महामंडळ आपल्या ४२ धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात.

उघड्यावर २.३२ लाख क्विंटल : भरडाई न झालेला धानही गोदामात शिल्लकगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आपल्या ४७ व आदिवासी महामंडळ आपल्या ४२ धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात. मात्र खरेदी केलेल्या धानाचे अद्यापही २३ कोटी १५ लाख रूपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. यात मार्केटिंग फेडरेशनकडे १४ कोटी ५० लाख तर आदिवासी महामंडळाकडे आठ कोटी ६५ लाख ९० हजार ९०० रूपयांचा समावेश आहे. आदिवासी महामंडळाने खरीप व उन्हाळी धानपीक मिळून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातून पाच लाख २३ हजार ३३९.६८ क्विंटल धान खरेदी केले. यापैकी दोन लाख १९ हजार ९९९.४६ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आले आहे. तर अद्यापही गोदामात ७१ हजार क्विंटल धान शिल्लक पडून आहे. तसेच उघड्यावर दोन लाख ३२ हजार ३५०.२२ क्विंटल धान पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे या उघड्यावरील धान्यात ओलावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांना आदिवासी महामंडळाच्या ४२ खरेदी केंद्रांतून घेतलेल्या धानाचे ६२ कोटी ६१ लाख ६४ हजार ६६४ रूपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. मात्र आठ कोटी ६५ लाखांचे चुकारे प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आपल्या ४७ खरेदी केंद्रांमार्फत खरीप व रबी मिळून एकूण सहा लाख ३८ हजार क्विंटल धान खरेदी केले. यापैकी उन्हाळी धान दोन लाख पाच हजार क्विंटल आहे. यात एक लाख ७० हजार क्विंटल धानाची मिलिंग अद्याप झालेली नसून गोदामात पडून आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसारे त्यांचे शिल्लक धान गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ६१ कोटी ९७ लाख १९ हजार ००१ रूपयांचे चुकारे केले आहेत. तर अद्यापही १४ कोटी ५० लाख रूपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.