शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीचे १०३६ प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: June 20, 2015 01:36 IST

निवडणुकीच्या रिंगणात राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) ...

गोंदिया : निवडणुकीच्या रिंगणात राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारांना आता जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांचे एक हजार ३६ प्रस्ताव तहसील कार्यालयांकडे सादर करण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव संबंधीत तहसील कार्यालयांकडून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.‘कास्ट वॅलिडिटी’ म्हटले की नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यासाठी अतिशय किचकट व क्लिष्ट अशी प्रक्रीया असल्याचे समजते. कारण कास्ट वॅलिडिटीसाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. शिक्षणापासून ते निवडणूक आता प्रत्येकच क्षेत्रासाठी शासनाने जातीचा दाखला बंधनकारक केला आहे. आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छीणाऱ्यांना त्यांच्या जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक झाल्याने हा दाखला मिळवून घेण्यासाठी सर्वांचीच तारांबळ उडत आहे. संबंधितांकडे हा दाखला नसल्यास त्यांना जातीच्या आधारे असलेल्या आरक्षणाचा लाभ घेणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षणासाठी तरी विद्यार्थी आपला दाखला तयार करवून घेत आहेत. त्यात आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आरक्षणाच्या आधारावर निवडणुकांच्या जागा तय करण्यात आल्या असल्याने उमेदवारांनाही याचा लाभ घेण्यासाठी कास्ट वॅलिटिडी सादर करणे बंधनकारक झाले आहे. अन्यथा त्या उमेदवाराचा अर्ज रद्द होणार हे ही तेवढेच खरे आहे. त्यामुळे निवडणुकांना बघता इच्छूकांनी कास्ट वॅलिडिटीसाठी तहसील कार्यालयावर धावा बोलल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कास्ट वॅलिडिटीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयांकडे आले आहेत. (शहर प्रतिनिधी)