शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चपराशी करतो जनावरांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:58 IST

येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे.

ठळक मुद्देव्यथा पशुधन विभागाची : कागदी घोडे नाचविण्यात अधिकारी व्यस्त

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे.कृषी क्षेत्रात महत्वाचा घटक म्हणून पशुसंवर्धन विभाग ओळखला जातो. पण जिल्ह्याचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तालुक्यातील बहुतेक जागा रिक्त आहेत. काही पशुधन दवाखान्यात तर चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण वेळेवर होत नसल्याने जनावरे दगावल्याचा प्रकार तालुक्यातील सौंदड व डोंगरगाव-खजरी या गावात घडला आहे.मागील महिन्यात सौंदड येथील रविंद्र चांदेवार यांची ७० ते ८० हजार किंमतीची गाय ८ दिवसांत दगावली. चांदेवार यांनी गायीची प्रकृती बरी नसल्याची माहिती सौंदडच्या पशुधन अधिकाºयांना दिली. प्रत्यक्ष भेट देऊनही त्या अधिकाऱ्यांनी स्वत: जावून त्या गरीब शेतकऱ्याच्या गायीची तपासणी केली नाही. त्या शासकीय पशुधन अधिकाऱ्यांनी फुकटचा सल्ला देवून एका खासगी डॉक्टरला त्या शेतकऱ्याच्या घरी पाठवून गायीची तपासणी करण्यात आली. मात्र शासकीय डॉक्टराने वेळीच स्वत: उपाययोजना केली असती तर रविंद्र यांची गाय कदाचित दगावली नसती.मागील महिन्यातच डोंगरगाव-खजरी येथील पुना कठाणे त्यांच्या दोन गायी एकाएकी मरण पावल्या होत्या. ही जनावरे मृत्युमुखी पडण्याची माहिती पशुधन अधिकाºयांना देण्यात आली. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना आता जनावरे दगावत असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे.तालुक्यात १०८ गावे आहेत. त्या गावांत १ लाख १६ हजार ४२९ पाळीव जनावरे असल्याची माहिती आहे. या जनावरांची निगा राखण्यासाठी तालुक्यातील ११ गावांमध्ये पशुधन दवाखाने निर्माण केले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे ७ व राज्याच्या ४ दवाखान्याचा समावेश आहे. तालुक्यात डोंगरगाव-खजरी, डव्वा, घाटबोरी-कोहळी, डोंगरगाव-डेपो हे स्टेटचे दवाखाने म्हणून ओळखली जातात. त्यात बहुतेक ठिकाणी डॉक्टरच नसल्याची बोंब आहे. या ठिकाणी प्रभारी डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. पण तेथील चपराशीच डॉक्टरची भूमिका बजावत असल्याचे पशुपालक सांगतात.तालुक्यातील सौदड, शेंडा, जांभळी-दोडके, कोसमतोंडी, पांढरी, चिखली, सडक-अर्जुनी येथे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्या दवाखान्यांमध्ये ‘रडत्याचे आसवे पुसण्या पुरतेच’ याप्रमाणे जनावरांची निगा घेतली जाते. लसीकरण वेळेवर केले जात नाही. औषधाचा साठा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे महागड्या जनावरांचा औषधोपचार वेळीच होत नसल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आता पाळीव जनावरांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने जनावरे घेणे फारच कठीण झाले आहे.तालुक्यातील जनावरांचे संगोपन करण्यासाठी गर्भधारणा, लसीकरण, कृत्रीम रेतन, नमूने तपासणी, बियाणे वाटप यातच कर्मचारी व्यस्त दिसतात. तर पशुसंवर्धन विभागाच्या योजना त्यात विशेष घटक दुधाळू जनावरे पुरवठा, शेळी गट पुरवठा, दुबत्या जनावरांना खाद्य पुरवठा अनुदान योजना, एकदिवसीय पिल्लू (कोंबडी) वाटप योजना, कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यासाठी कागदी घोडे नाचविण्यात अधिकारी व्यस्त असतात. मात्र मुख्य समस्येकडे या विभागाच्या अधिकाºयांचे दुलक्ष झाले आहे.सेवा शुल्काच्या नावे पैशाची वसुलीशासनाच्या सेवा शुल्काच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जाते. त्यात मागील वर्षात ४१ हजार ३९० रुपये जमा झाले. मात्र सेवाच मिळत नसल्याने सेवा शुल्क तरी का भरावे, असाही सवाल केला जात आहे. सदर विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे आता शेतकºयांच्या हातून त्यांच्या अर्थार्जनाचे साधन असलेले किमती जनावरे मृत्युमुखी पडत आहे.