शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

कमी वीज दाबामुळे पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:14 IST

कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता विजेच्या कमी दाबाचा फटका सहन करावा लागत आहे.

शेतकरी हवालदिल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेंडा (कोयलारी) : कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता विजेच्या कमी दाबाचा फटका सहन करावा लागत आहे. वीज विभागाच्या भोंगळ कारभाराने या परिसरातील शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवानी, कोयलारी, मोहघाटा, सालईटोला, कन्हारपायली, उशिखेडा, प्रधानटोला, कोहळीटोला, नरेटीटोला व पुतळी येथील शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिक करपले आहे. याची तक्रार देवरी येथील उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार करण्यात आली. मात्र यावर तोडगा न काढता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकटाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. सततच्या दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी यावर्षी या परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. सध्या धान गर्भात येत आहे. अशावेळी धानाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. परंतु विजेचा दाब खूपच कमी असल्याने मोटारी सुरूच होत नाही. त्यामुळे धान पीक करपत असून वाळत आहे. याची माहिती वीज विभागाच्या अभियंत्यांना वारंवार देण्यात आली. यावर तोडगा न काढता कोणते ना कोणते कारण पुढे करुन ते टोलवा टोलवी करीत आहेत. मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात आली. धान पिकासाठी एप्रिल महिन्यातच पाण्याची अधिक गरज भासते. मात्र विजेचा दाबच अत्यल्प असल्याने मोटारी सुरूच होत नाही. त्यामुळे पाण्याअभावी धान पीक वाळत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कुटुंबानिशी शेतात राबून शेतकरी रक्ताचे पाणी करतो. धानाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँका, सोसायटी तसेच आपसात उसनवारीची रक्कम घेवून शेतात ओतून टाकली. अशातच पाण्याअभावी धानपिक नष्ट होत असल्याच्या मार्गावर आहे. कर्जाची परतफेड कशी होईल या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा वाली कोण? असा सवाल आता शेतकऱ्यांनाच भेडसावत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांनी आपल्या समस्या कोणापुढे मांडाव्या हे कळायला मार्ग नाही. शेवटचा उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे गटनेता गंगाधर परशुरामकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीवर तासभर चर्चा केली व लेखी निवेदन दिले. यावेळी माजी सरपंच आनंदराव ईळपाते, मुकुंदराव कापगते, बाबुलाल सयाम, किशोर लांजेवार व नरेश टेंभरे हे होते. यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. पांढरी परिसरातही पीक करपले पांढरी : परिसरातील सितेपार, मालीजुंगा, धानोरी, कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, चिचटला, रेंगेपार, मुंडीपार आदि गावांत काही प्रमाणात चुलबंद जलाशयातून पाणी पुरवठा होत असतो. तर काही शेतकऱ्यांनी वीज विभागाकडून कनेक्शन घेतले आहे. परंतु सौंदड येथील मुख्य विद्युत कार्यालयातून वीज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी करपू लागले आहे. प्राथमिक अवस्थेतच पिकांची वाढ पाण्याअभावी खुंटलेली वाटत आहे. अभियंता बडोले यांच्याशी बोलले असता त्यांनी दोन दिवसांत निराकरण करु असे सांगीतले. परंतु आठ दिवसांचा कालावधी होवूनही कसलीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोसमतोंडी परिसरातील शेतकरीबांधवांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांसह विद्युत अधिकाऱ्यांना बोलावून लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. काही शेतकऱ्यांनी वीज पुरवठा शेतीकरिता होत नसताना वीज कनेक्शन का दिले असा सवाल केला. (वार्ताहर) शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा वीज क नेक्शन घेऊनही पंपासाठी वीज पुरवठा होत नसेल व पाण्यासाठी अभावी पीक मरत असेल तर वीज कनेक्शनचा फायदा काय असा सवाल आता परिसरातील कृषी पंप धारक शेतकरी करीत आहेत. वीजेचे बील भरून सुद्धा पीक व मरत असल्यास याला जबाबदार कोण असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे वीज विभागाने वीज पुरवठ्यात सुधारणा न केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा अविनाश काशीवार, वामेश्वर टेंभरे, निरज मेश्राम व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.