शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्ज माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 00:59 IST

३० जून २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज कोणतीही अट न ठेवता सरसकट माफ करण्यात यावे,

शेतकऱ्यांची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : ३० जून २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज कोणतीही अट न ठेवता सरसकट माफ करण्यात यावे, कोणतीही जबरदस्ती न करता पीकविमा ऐच्छिक करण्यात यावा, डॉ.एम.एस.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या या मागण्यांसाठी सेवा सहकारी संस्था, बँक प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी तहसीलदार संजय रामटेके यांच्यामार्फत महसूल, कृषी, सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाध्यक्ष उपाध्यक्ष बँक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची सभा बी.जी.पटले कनिष्ठ विद्यालयात मुंडीकोटा संस्थेचे अध्यक्ष गोपीचंद भेलावे यांच्या अध्यक्षतेत खोपडाचे अध्यक्ष नत्थु बावणकर, खडकीचे अध्यक्ष डॉ. शिशुपाल पटले, इंदोराचे अध्यक्ष हेमराज अंबुले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. सर्वात प्रथम आंदोलनात व आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे काही अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून आलेले तेजराम चव्हाण, श्रावण रहांगडाले, भुमेश्वर रहांगडाले, ओमप्रकाश पटले, दिपक पटले, दिनेश चोभरे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.सभेत कर्जमाफीवर अनेक प्रतिनिधी व शेतकऱ्यांनी आपले विचार मांडले. चर्चेत सरसकट कर्जमाफी व अन्य मागण्यांना घेऊन तहसीलदारांमार्फत कृषी व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना बळीराम धुर्वे, राधेश्याम नागपूरे, मनराज सोनवाने, इंदल बिसेन, केशरचंद पारधी, मनोज बिसेन, बाबुलाल चौधरी, यशवंत रहांगडाले उपस्थित होते. सभेत किशोर रहांगडाले, सतपाल पारधी, राजेश ग्यानचंदानी, देवचंद रिनाईत, हरिकीशन कडव, छबीलाल टेंभरे, मधुकर तिडके, हंसराज रहांगडाले, डॉ. संजय भांडारकर, उत्तम कुकडे, रंगलाल अंबुले, मारोती पटले, यशवंत पटले, श्यामा ठाकुर,यशवंत कांबळी, टिकाराम चौधरी, चुन्नीलाल पटले, श्यामराव पटले, कंठीलाल ठाकरे उपस्थित होते.