शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रुग्णांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:46 IST

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालय : रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने अद्यापही समस्या मार्गी लावली नसल्याने रुग्णांची समस्या कायम आहे.यापूर्वी सुध्दा बीजीडब्ल्यू रुग्णालयातील बोअरवेल बंद असल्याने रुग्णांना आठ ते दहा दिवस पिण्याचे पाणी दूरवरुन आणावे लागते होते. यामुळे रुग्णांचे हाल झाले होते. रुग्णांची ओरड वाढल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा पाण्यासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार बीजीडब्ल्यू रुग्णालयाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकेज झाल्याने येथील पाणी पुरवठा बंद आहे. तर रुग्णालयातील दोन्ही बोअरवेल बंद असून त्यांची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी रुग्णांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला रुग्णालय असल्याने येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येथे येतात.आधीच रुग्णांच्या नातेवार्इंकांची उपचारासाठी धावपळ सुरू असताना आता मात्र त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या रुग्णालयाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून रक्तपेढीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.रुग्णालयात आधीच पाण्याची समस्या असताना बांधकामासाठी येथील बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केल्याने मोटार बिघडल्याचे बोलल्या जाते. मागील दोन दिवसांपासून रुग्णांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना मात्र रुग्णालय प्रशासनाने केवळ थातुर मातुर उपाय योजना करुन याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्याने रुग्णांचे हाल होत आहे.रुग्णांचे आरोग्य धोक्यातजिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्ण येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. गर्भवती महिला आणि लहान बालकांचा सुध्दा समावेश आहे. मात्र रुग्णालयात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. हे पाणीे पिण्यायोग्य आहे किंवा नाही, याची सुध्दा खात्री नसून रुग्ण तेच पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.दुसऱ्यांचा घडला प्रकारबीजीडब्ल्यू रुग्णालयात पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी बोअरवेल तीन महिन्यापूर्वी सुध्दा बिघडली झाली होती. तेव्हा सुध्दा बोअरवेल दुरूस्तीसाठी आठ दिवस लागले होते. आता पुन्हा तिच समस्या निर्माण झाली असून ती मार्गी लावण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.रुग्णालयातील बोअरवेल दुरूस्तीचे आदेश दिले आहे. लवकरच दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल यानंतर पाण्याची समस्या राहणार नाही.- डॉ.प्रदीप कांबळे,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू.