शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:12 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच....

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार : अधिष्ठातांचा दोन तास घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला बंद असलेला आक्सिजन मॉस्क लावल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रुखमोडे यांचा घेरावा घालून संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.धर्मश्याम चंद्रसेन पटले (४८) रा. नवरगाव असे बंद आक्सिजन मॉस्क लावल्याने मृत्यु झालेल्या रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पटले यांना खोकल्याच्या त्रास असल्याने शनिवारी (दि.२) दुपारच्या सुमारास त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयुच्या बेड क्रमांक दोन दाखल करण्यासाठी डॉ. मोनल अग्रवाल यांनी पाठविले. मात्र त्या क्रमांकाचा बेड खाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना जनरल वार्डात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना आक्सिजन मॉस्क लावण्यात आले. मात्र त्यात आक्सिजन नसल्याने रुग्ण जोरोने श्वास घेवू लागला. रुग्णांच्या नातेवाईकांनी याची माहिती उपस्थित वैद्यकीय अधिकाºयांना दिली. मात्र त्यांनी वेळीच उपचार करणाºयाकडे दुर्लक्ष केल्याने पटले यांचा मृत्यु झाला. दरम्यान या घटनेची माहिती पटले यांच्या नातेवाईकांनी काँग्रेस नेता अमर वराडे, आलोक मोहंती, अ‍ॅड.योगेश अग्रवाल, जि.प.सदस्य शेखर पटले यांना दिली. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात पोहचत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रुखमोडे यांचा घेराव घालून याचा जाब विचारला. तसेच हलगर्जीपणा करणाºया डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. वराडे यांनी प्रा. विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, विभाग प्रमुख डॉ.संजय येडे, प्रोफेसर डॉ.राजेंद्र वैद्य यांना निलंबित करण्याची व त्यांचे लायन्स रद्द करण्याची मागणी केली. वैद्यकीय महाविद्यालयातील अव्यवस्था दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना गोंदिया येथे बोलविण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतकाचा मृत देह न उचलण्याची भूमिका घेतली होती.रजा न घेताच विभाग प्रमुख गायबवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रुखमोडे यांनी प्राध्यापक विभागप्रमुख डॉ.येडे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून तुम्ही कुठे आहात अशी विचारणा करित वैद्यकीय महाविद्यालयात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी आपण कान्हा केसली येथे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे डॉ.येडे हे सुट्टीचा अर्ज न देताच सुट्टीवर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल