शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

संयम, आत्मविश्वास, कठोर परिश्रम हेच माझ्या यशाचे पासवर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या होय. शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात दिव्या उत्तीर्ण झाली असून, तिला ३३८ रँक मिळाला आहे. दिव्याची आई जिल्हाधिकारी, तर वडील नाशिक जि. प.मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दिव्याला लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेविषयी ओढ होती. आई-वडील दाेघेही प्रशासकीय सेवेत असल्याने तीसुद्धा अनेकदा त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये येत-जात असायची.

अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ही बाब मला योग्य वाटते. अपयशाने खचून न जात अपयशामागील उणिवा काय याचा शोध घेऊन त्या दूर करण्यावर मेहनत घ्या, थोडासा संयम बाळगा आणि पूर्वी इतक्याच आत्मविश्वासाने पुढे जा आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, ही यशाची त्रिसूत्री आत्मसात केल्यास नक्कीच यश मिळत असते. हीच माझ्या यशाची खरी त्रिसूत्री असल्याचे यूपीएससी उत्तीर्ण दिव्या गुंडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या होय. शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात दिव्या उत्तीर्ण झाली असून, तिला ३३८ रँक मिळाला आहे. दिव्याची आई जिल्हाधिकारी, तर वडील नाशिक जि. प.मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दिव्याला लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेविषयी ओढ होती. आई-वडील दाेघेही प्रशासकीय सेवेत असल्याने तीसुद्धा अनेकदा त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये येत-जात असायची. त्यामुळे तिलासुद्धा प्रशासकीय सेवेत जाण्याची ओढ निर्माण झाली. दिव्याचे प्राथमिक शिक्षण सोलापूर, तर त्यापुढील शिक्षण नाशिक आणि पुणे येथे झाले. दिव्याने पुणे येथेच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आई-वडिलांचा तिच्यावर तिने प्रशासकीय सेवेत जावे यासाठी दबाव नव्हता. तुला मनापासून जे वाटते ते कर एवढी मोकळीक तिला आई-वडिलांनी दिली होती. मात्र, दिव्याचीच मनापासून प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. २०१७ मध्ये तिने पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली; पण तिला यात अपयश आले. पण ती खचली नाही. मात्र, तिसऱ्यांदा तिला जेव्हा अपयश आले, तेव्हा ती थोडी खचली, तिचा आत्मविश्वास थोडा डळमळला; पण दिव्या घेत असलेली मेहनत पाहत तिच्या आईने तिला धीर दिला. स्वत: आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून तिला मार्गदर्शन केले. मग दिव्यानेसुद्धा तिच्या अपयशातील उणिवा शोधल्या आणि त्या दूर करीत ती पूर्वीइतक्या आत्मविश्वासाने तयारीला लागली. तिने बाळगलेला संयम, आत्मविश्वास आणि घेतलेल्या कठोर परिश्रमाचे फलित म्हणजेच शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि ती त्यात उत्तीर्ण झाली. ही तिच्यासाठी व आई-वडिलांसाठीसुद्धा तेवढीच आनंदाची बाब होती. ­

दिव्याच्या अभ्यासासाठी पुणेला केली बदली- यूपीएससी परीक्षेसाठी दिव्या खूप परिश्रम घेत होती. तिचे परिश्रम पाहूनच आई (नयना गुंडेे) यांनी पुणे येथे बदली करून घेतली. तिथे तिला चांगले क्लासेस तसेच त्या स्वत: वेळात वेळ काढून मार्गदर्शन करीत होत्या. वडीलसुद्धा तिला वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. याचीसुद्धा तिला खूप मदत झाली. माझे घर हीच माझी प्रेरणा- आई-वडील दोघेही प्रशासकीय सेवेत असल्याने सुरुवातीपासून तिला या दोघांकडून वेळाेवेळी मार्गदर्शन मिळाले. यूपीएससीचा अभ्यास करताना तिला येणाऱ्या अडचणी ती आईच्या मदतीने सोडवीत होती. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी तिचे घरच तिच्यासाठी प्रेरणा असल्याचे दिव्याने सांगितले. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य राहिले असे सांगितले. 

स्वप्रेरणा तेवढीच महत्त्वाची - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि आपण जे करू ते मनापासून शंभर टक्के देऊन करू ही स्वप्रेरणा बाळगण्याची गरज आहे. एक-दोनदा अपयश आले तरी खचून न जाता त्यातील उणिवा शोधून त्या दूर करण्यासाठी मेहनत घ्यावी आणि कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, असा सल्ला दिव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. माझ्यासाठी अभिमानाची बाब - प्रत्येक आई-वडिलाला आपली मुले ही आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, त्यांनी खूप उंची गाठावी असे वाटते. दिव्याने ही लहानपणी थोडी नटखट होती. त्यामुळे ती प्रशासकीय सेवेत जाणार की नाही याबाबत मला सुरुवातीला खात्री नव्हती; पण मागील चार-पाच वर्षे तिने खूप कठोर परिश्रम घेतले आणि ती यूपीएससी उत्तीर्ण झाली. ही खरोखरच माझ्यासाठी अभिमान बाब असल्याने नयना गुंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग