शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:06 IST

मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मागील पंधरा दिवसांपासून सोशल मिडियावर बालकांचे अपहरण करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात आहे. या अफवेमुळे संपूर्ण जिल्ह्याभरातच दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात कोणताही अनोळखी पुरुष अथवा महिला आढळल्यास त्यांची विचारपूस न करता थेट संशय घेवून मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान असाच संशय घेत पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री तालुक्यातील कुंभारटोली येथे घडली.प्राप्त माहितीनुसार कुंभारटोली येथे एका अनोळखी महिला व पुरुषाचा घेराव करुन बालके चोरुन नेणारे असल्याच्या संशयावरुन दोघांना जबर मारहाण करण्यात आली. दरम्यान आमगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते दोघे पती-पत्नी असून गोंदिया जिल्ह्यातील अदासी (तांडा) येथील रहिवासी आहेत. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातील भंगार, खरडे, प्लास्टीक बॉटल इत्यादी गोळा करुन त्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती पुढे आली. रुपचंद देशमुख (४०) व पत्नी कविता रुपचंद देशमुख (३५) अशी त्यांची नावे आहेत. ते कुंभारटोली परिसरात पोहोचले असता परिसरातील लोकांनी बालके चोरी करणारे असल्याच्या संशयावरुन कसलीही शहानिशा न करता मारहाण केली. बालकांची चोरी करुन अवयव विकणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.अफवांना बळी पडू नकाजिल्ह्यात लहान बालकांचे अपहरण करुन त्यांचे अवयव चोरी करुन नेणारी टोळी सक्रीय असल्याची केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात न घेता पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.