शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

पटेल यांनी निवड केलेल्या पाथरीचा कायापालट करणार

By admin | Updated: November 25, 2014 22:57 IST

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला. पाथरी येथे भेट देऊन गावाची पाहणी केल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना आ.राजेंद्र जैन बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदर्श गाव घडविण्यासाठी गोरेगाव तालुक्याच्या पाथरी गावाची निवड केली आहे. या गावाची पाहणी करण्यासाठी व नागरिकांशी वार्तालाप करून समस्या जाणून त्याची सोडवणूक कशा पध्दतीने करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी आ.जैन यांनी पाथरी गावाला भेट दिली. यावेळी गोरेगाव तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. खासदार पटेल यांनी आदर्श गाव घडविण्यासाठी पाथरी गावाची निवड केल्याबद्दल पाथरी येथील नागरिकांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावकऱ्यांनी खा.पटेल यांचे आभार मानले. आ.राजेंद्र जैन यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना आ.जैन म्हणाले, खा.पटेल यांनी दूरदृष्टी ठेऊन आदर्श गाव बनविण्यासाठी पाथरी गावाची निवड केली आहे. या गावाचा सर्वागिण विकास करून कायापालट करण्याची जबाबदारी आता सर्वाची आहे. अधिकाऱ्यांनी गावातील समस्यांची तत्काळ सोडवणूक करुन पाथरीला आदर्श गाव बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष केवलराम बघेले, खंडविकास अधिकारी पुराम, पाथरीच्या सरपंच आशा खांडवाये, उपसरपंच ईश्वरलाल राऊतकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जियालाल कटरे, पोलीस पाटील सोमराज बघेले, माजी सरपंच जियालाल बघेले, डॉ.सी.आर. कटरे, माजी पंचायत समिती सदस्य मुलचंद खांडवाये, माजी जि.प. सदस्य पुष्पनबाई भुरकुडे, डॉ. बी.टी.बघेले, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश कटरे, ग्रा.पं. सदस्य हनीब मो. शेख, निर्मला देशकर, धुर्पता चनाप, शकुंतलाबाई वडगाये, रोशन बिसेन, गोपीचंद भोयर, नानेश्वर शहारे, भोजराज कटरे, डॉ. सुरेश तिरेले, केंद्र प्रमुख शहारे, मुख्याध्यापिका राऊत, पटले, सी.ए. रहांगडाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत आरोग्य विभाग, कृषि विभाग, बांधकाम विभाग, आय.सी.डी.एस. विभागाचे कर्मचारी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)