शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक स्थानांतरित झाल्याने प्रवाशांची तारांबळ

By admin | Updated: August 23, 2014 01:56 IST

सडक/अर्जुनी येथील शेंडा फाटा चौकातील बस स्थानक हा जुन्या ठिकाणच्या शिवमंदिराजवळ गेल्यामुळे आता प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

सडक/अर्जुनी : सडक/अर्जुनी येथील शेंडा फाटा चौकातील बस स्थानक हा जुन्या ठिकाणच्या शिवमंदिराजवळ गेल्यामुळे आता प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. शेडा फाटा चौकातील बस स्थानकामुळे गोंदिया, गोरेगाव, डव्वा, साकोली, भंडारा, देवरी, नागपूर, अर्जुनी/मोरगाव, नवेगावबांधवरून ये-जा करणाऱ्या सडक/अर्जुनी येथील कर्मचाऱ्यांना फारच त्रास होणार आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महामंडळ, बँक, जिल्हा परिषदेच्या शाळा, पोस्ट आॅफिस, वन विभाग व काही खासगी शाळांतील कर्मचारी अप-डाऊन करतात. त्यामुळे त्यांच्या ये-जा करण्यात मोठीच समस्या निर्माण होणार आहे. या त्रासामुळे काही अधिकाऱ्यांनी रोज सकाळी १० वाजता आपल्या चपराशांना मुख्य बस स्थानकावर दुचाकी घेवून रहा व अधिकाऱ्यांना ने-आण करा, असे बजावल्याचेच दिसत आहे.शेंडा फाटा चौकातील बस स्थानक मुख्य बस स्थानकाकडे गेल्याने आता शेंडा फाटा चौकातील अपघाताची संख्या कमी झाली आहे. तसेच ते चौक वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होत होते. शनिवारी बाजाराच्या दिवशी तर बाजार करणाऱ्यांना व ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा राहत नव्हती. याच चौकात इतर व्यायसायिकांनी आपले ठेले रस्त्यावर लावल्याने वाहन धारकांना डांबरी रस्त्यावरच वाहने ठेवावे लागत होते व प्रवाशांना उतरावे लागत होते. अशा वर्दळीच्या ठिकाणी नेहमी अपघाताची शक्यता राहत होती. १६ आॅगस्टपासून सर्व बसेस शिव मंदिराजवळील मुख्य बस स्थानकावर थांबतात. त्यामुळे स्टेट बँक, वन विभाग व एकात्मिक बाल कल्याण विभागाकडे जाण्यासाठी एक किमीपर्यंतचे अंतर पायदळ चालावे लागते. गोंदियाच्या आगार प्रमुखांनी लक्ष देवून सडक/अर्जुनी येथे मुख्य बस स्थानक शिवमंदिर व दुसरे बस स्थानक हे पेट्रोल पंपजवळ द्यावे, अशी मागणी होत आहे. या दोन बसस्थानकांमुळे प्रवाशांना त्रास होणार नाही व त्यांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचणे सोईस्कर ठरेल. दोन बस स्थानकांची मागणी पूर्ण झाल्यास त्या ठिकाणी प्रवाशांना उभे राहण्यासाठी तात्पुरता लोखंडी निवारा तयार करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)