शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजवर धावणार पॅसेंजर

By admin | Updated: August 10, 2016 00:03 IST

नव्याने विकसित केलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

१५ आॅगस्टचा मुहूर्त ? : विभागीय व्यवस्थापकांनी घेतली इंजिन ट्रायल गोंदिया : नव्याने विकसित केलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज अंतर्गत जबलपूर ते सुकरीमंगेला दरम्यान येत्या स्वातंत्रदिनापासून म्हणजे १५ आॅगस्टपासून गोंदिया-जबलपूर पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने चाचण्या सुरू केल्या आहे. सदर ब्रॉडगेजच्या ट्रॅकवरून पहिल्यांना इंजिनचे ट्रायल घेण्यासाठी नागपूर मंडळाचे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल आपल्या चमूसह पोहोचले होते. कछपुरावरून रवाना झाल्यावर १० मिनिटांनंतर इंजिन गढा स्थानकावर पोहोचले. तेथे निरीक्षणादरम्यान प्लॅटफार्मसह शेडचे अपूर्ण बांधकाम व चिखलयुक्त स्थिती पाहून ते स्थानिक व्यवस्थापनावर नाराज झाले. त्यांनी सर्व अपूर्ण कामांचे छायाचित्र घेतले. त्यानंतर त्यांनी ग्वारीघाट, जमतरा, चारघाट पिपरिया व बरगी येथेसुद्धा इंजिन थांबवून निरीक्षण केले. (प्रतिनिधी) ट्रेनसाठी लागणार सुरक्षा आयुक्तांची एनओअी मंडळ रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जबलपूर ते सुकरीमंगेलादरम्यान १५ आॅगस्ट रोजी पॅसेंजर ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे. परंतु सर्व कामसुद्धा पूर्ण करावयाचे आहे. मुख्य सुरक्षा आयुक्तांद्वारे ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच सदर ट्रेन सुरू करणे शक्य होणार आहे. अशी होती इंजिनची गती ट्रायल इंजिन कछपुरा ते ग्वारीघाटपर्यंत ५५ किमी प्रतितास, ग्वारीघाट ते बरगीपर्यंत ५० व बरगी ते सुकरीपर्यंत २० किमी प्रतितासाच्या गतीने चालविण्यात आले. ग्वारीघाट येथील अपूर्ण कार्यामुळे डीआरएम नाराज झाले व १५ आॅगस्टपूर्वी कोणत्याही स्थितीत काम पूर्ण करण्याचे तेथील व्यवस्थापनाला निर्देश दिले. आत झोन प्रशासन कोणत्याही स्थितीत १५ आॅगस्टचे उद्दिष्ट समोर ठेवून सुकरीमंगेलापर्यंत प्रवासी गाडी चालविण्याच्या तयारीत गुंतले आहे.