शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी विमानांनी येऊ शकते बिरसी विमानतळ नफ्यात

By admin | Updated: January 25, 2017 01:33 IST

गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो.

वर्षाला ९ कोटींचा तोटा : विमानसेवेसाठी राजकीय दबावाची गरज गोंदिया : गोंदियाजवळील बिरसी विमानतळ प्रवासी विमानसेवेसाठी सज्ज आहे. अगदी २४ तासाच्या पूर्वसुचनेवरून आम्ही ही सेवा सुरू करू शकतो. प्रवासी विमानसेवा सुरू केल्यानंतरच हे विमानतळ नफ्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बिरसी विमानतळाचे संचालक सुभाष प्रजापती यांनी व्यक्त केली. बिरसी विमानतळावर कोणतेही मोठे व्यावसायिक विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. तब्बल ३२०० मीटरची धावपट्टी आहे. नाईट लँडींगसह खराब हवामानातही विमान उतरू शकेल अशी व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी विमानसेवा सुरू करणे गरजेचे झाले आहे. प्रजापती यांनी ते गोंदियात आल्यापासून विमानतळाच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती पत्रपरिषदेत दिली. विशेषत: येथील प्रकल्पग्रस्त आणि सिक्युरिटी गार्डचा प्रश्न काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, या ठिकाणी एकूण ६५ सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी विमानतळासाठी ४९ तर फाईंग अकादमीसाठी १६ गार्ड लागलेले आहेत. हे दोन्ही ठिकाणचे गार्ड आतापर्यंत दोन एजन्सीमार्फत ठेवले होते. नियमानुसार ९० टक्के गार्ड हे सरकारी सेवेतील माजिी कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत जे गार्ड येथे कार्यरत होते त्यात स्थानिक आणि अप्रशिक्षित गार्ड आहेत. त्यामुळे मी यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथून नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेनुसार गार्ड नियुक्त करण्याचा कंत्राट नवीन एजन्सीला देण्यात आला आहे. ही एजन्सी १ फेब्रुवारीपासून नवीन गार्ड नियुक्त करणार आहे. हे सर्व नियमानुसार होत असताना काही लोक जुन्याच गार्डला घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रजापती म्हणाले प्रकल्पग्रस्तांपैकी ज्या ३० लोकांनी कमी मोबदला मिळाल्याचे सांगत न्यायालयात प्रकरण दाखल केले होते त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला दिला जाणार आहे. या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची कोणतीही हमी आमच्या करारपत्रात नाही, असेही प्रतापती यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी) नाना पटोले विमानसेवेसाठी प्रयत्नशील बिरसी विमानतळावरील सोयी आणि प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबद्दल अधिकाऱ्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी विमानसेवा सुरू करण्याबद्दल सकारात्मकता दाखवून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राज्यातील ज्या १० शहरांचा विमानसेवेसाठी राज्य सरकार विचार करत आहे त्यात गोंदिया आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.