शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी विमान वाहतूक सेवेला लवकरच प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

गोंदिया : गोंदिया येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या दोन अडचणींवर लवकरात लवकर उपाय शोधून वाहतूक ...

गोंदिया : गोंदिया येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या दोन अडचणींवर लवकरात लवकर उपाय शोधून वाहतूक सुरू करू व गोंदियाला राष्ट्राच्या सेवेत जोडू, असे केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार सुनील मेंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यामुळे लवकरच गोंदिया विमानतळावरून वाहतूक प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खा. सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या विमानतळाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला थेट केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उत्तर देताना उडान अभिनय योजनेतंर्गत हवाई वाहतुकीसाठी सज्ज असलेले मात्र प्रत्यक्षात वाहतूक सुरू न झालेले किती विमानतळ देशात आहेत, वाहतूक सुरू करण्यासंदर्भात गोंदिया विमानतळाच्या परवानगीचा विषय केव्हापर्यंत पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल आणि गोंदिया विमानतळावरून मालवाहतुकीची व्यवस्था म्हणजेच कार्गो सेवा सुरू होणार आहे का, असा प्रश्न पुरवणी मागण्याच्या वेळी खासदार सुनील मेंढे यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशात उडान योजने अंतर्गत ३७० हवाई मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात ३५९ मार्गांवर वाहतूक सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेअंतर्गत ५९ नवीन विमानतळे उभारण्यात आली असून देशातील एक एक नागरिक हवाई सफर करू शकेल असा कल्याणकारी विचार घेऊन ही योजना कार्यान्वित केली जात असल्याचे सांगितले.

.................

दोन अडचणी लवकरच दूर करणार

उडान नियोजित योजनेच्या चौथ्या टप्प्यात गोंदिया विमानतळावरून दोन चार्टर विमानांच्या माध्यमातून गोंदिया ते हैदराबाद आणि गोंदिया ते इंदोर अशा मार्गांवर वाहतूक केली जाणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीने सहमती दर्शविली आहे. मात्र सध्या दोन अडचणी या देत असून रनवे अँड सिक्युरिटी एरियासाठी जमीन हस्तांतरणाची गरज आहे. जून २०२१ भारतीय विमान वाहतूक महासंचालनालयाचे एक पथक जाऊन यासंदर्भात तपासणी करून आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यासोबतच जो मार्ग निश्चित केला आहे त्या मार्गावर मध्यपासून उत्तर पूर्व भारतादरम्यान कंपनीकडे एकच विमान उपलब्ध आहे. हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावू. गोंदिया विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहता चर्चा करून मालवाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.