शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग आवश्यक

By admin | Updated: June 17, 2016 02:11 IST

दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व बिगडत चाललेले पर्यावरणाचे संतुलन यावर आळा घालण्यासाठी १ जुलै रोजी

परिविक्षाधीन डीएफओ पाटील : वनांच्या रक्षणात गावांचे हित, दोन कोटी वृक्ष लागवडबोंडगावदेवी : दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ व बिगडत चाललेले पर्यावरणाचे संतुलन यावर आळा घालण्यासाठी १ जुलै रोजी राज्यात सर्वत्र दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वृक्ष लागवड कार्यक्रम एक प्रभावी लोकचळवळ व्हावी यासाठी या उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग अती आवश्यक आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यानेच वृक्षांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन करता येईल. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात गावातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन परीविक्षाधिन जिल्हा उपवनसंरक्षक तथा अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल पाटील यांनी केले. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या जनजागृती दरम्यान येथील क्षेत्रसहाय्यक कार्यालयात आयोजित संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या विचार मंथन बैठकीदरम्यान ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी परीविक्षाधिन जिल्हा उपवनसंरक्षक तथा वन परिक्षेत्राधिकारी राहुल पाटील होते. मार्गदर्शक म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, क्षेत्र सहाय्यक एम.एम. धुर्वे होते. याप्रसंगी स्थानिक सरपंच राधेशाम झोळे, निमगावचे सरपंच देवाजी डोंगरे, खांबीच्या सरपंच शारदा खोटेले, प्रधान वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमरचंद ठवरे, भाष्कर कवरे, चोपराम शिवणकर, योगिराज ढवळे, अशोक लंजे, सेवानिवृत्त वनाधिकारी यशवंत लंजे, बाळबुद्धे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राहुल पाटील म्हणाले, गावाजवळच्या जंगलाची वनविभागाची जबाबदारी असली तरी गावाच्या हितासाठी सामान्य जनतेने वृक्षांची जोपासना करण्यासाठी, आपले एक कर्तव्य समजून प्रत्येकाने पुढे येवून वनविभागाला सहकार्य करावे. वृक्षतोडीने पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. वातावरणात बदल, अनियमित पर्जन्यमान अशी जाणीव निसर्ग आपल्याला करुन देत आहे. वृक्ष संगोपन करुन जंगलवाढ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांना वनापासून बरेच फायदे आहेत. ग्रामस्थांनी स्वत:चे गाव ‘वनग्राम’ घोषित करुन प्रस्ताव वनविभागाकडे पाठवावे. यामुळे गावाचा विकास होण्यात हातभार लागेल, असे पाटील यांनी सांगितले. १ जुलै रोजी येथील रोपवनात १२ हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामध्ये गावातील जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. लोकसहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. यामध्ये शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन सुनील पाटील यांंनी केले. याप्रसंगी वनक्षेत्राधिकारी रहांगडाले, क्षेत्र सहाय्यक धुर्वे यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार देवेंद्र उईके यांनी केले. (वार्ताहर)