शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या मान्य करण्यास भाग पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:41 IST

शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे. शाळेत शिकविणारा शिक्षक समाधानी व आनंदी असेल, त्याला उत्तम स्थान मिळत असेल तर तो आनंदाने समाजाचा विकास घडवून आणतो. परंतु सद्यस्थितीत शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.

ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : सर्व मुख्याध्यापकांनी एकाच संघटनेत सहभागी व्हावे

आॅनलाईन लोकमतखजरी : शाळा ही समाजाची लघुप्रतिमा आहे. शाळेत शिकविणारा शिक्षक समाधानी व आनंदी असेल, त्याला उत्तम स्थान मिळत असेल तर तो आनंदाने समाजाचा विकास घडवून आणतो. परंतु सद्यस्थितीत शिक्षक, मुख्याध्यापकांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे त्यांना समस्या सोडविण्यासाठी हेलपाटे खावे लागत आहे. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी संघटनेत सहभागी होवून मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.येथील आदिवासी विविध विकास हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाद्वारे आयोजीत १७ व्या ‘जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या शैैक्षणिक संमेलन- २०१८’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शत्रुघ्न बिडकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून एन.एन. येळ व पाहुणे म्हणून मारोतराव खेडीकर, नरेंद्र वाळके, सतीश जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुनील मांढरे, अशोक पारधी, अनिल बाळसराफ, प्रफुल कचवे उपस्थित होते.पुढे बोलताना परशुरामकर यांनी, प्रत्येक राज्याने अर्थसंकल्पात एकूण रकमेच्या ६ टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करायची असते. परंतु राज्य सरकार केवळ ३ टक्के रक्कम खर्च करते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर मात करण्यासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी एकाच संघटनेत सहभागी होऊन सरकारवर दबाव निर्माण करावा. त्याशिवाय मागण्या मान्य होणार नाही, असे सांगितले.प्रास्ताविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी मांडले. संघटनेच्या समस्यांचे विवरण यशवंत परशुरामकर यांनी मांडले. यामध्ये शासन व खात्याची मान्यताप्राप्त स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकसंच मान्यता देण्यात येते त्याचप्रमाणे स्वतंत्ररित्या शिक्षकेतर संघास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.कार्यक्रमासाठी दिलीप चाटोरे, खुशाल कटरे, यशवंत परशुरामकर, आर.एन. हेडाऊ, रामसागर धावडे, रजिया बेग यांच्यासह जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातील पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.