शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी

By admin | Updated: January 12, 2017 00:21 IST

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लार्इंड (एनएबी) मुंबई शाखा कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

समावेशित शिक्षण : गोंदियातील १२ विद्यार्थी रेल्वेने झाले रवाना गोंदिया : नॅशनल असोसिएशन फॉर ब्लार्इंड (एनएबी) मुंबई शाखा कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा ११ ते १३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण गट साधन केंद्र पंचायत समिती गोंदिया अंतर्गत निवड झालेल्या एकूण १२ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरून महाराष्ट्र एक्सप्रेसने गोंदिया रेल्वे स्थानकावरून पाठविण्यात आले. त्यांच्यासह विशेष शिक्षक व समावेशित शिक्षण तज्ज्ञसुद्धा रवाना झाले आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा एखादा अवयव नियतीने हिरावून घेतला असला तरी ते आपली कमतरता न मानता ताकद समजून त्यांना शिक्षणाच्या प्रत्येक्ष क्षेत्रात भाग घेण्याची संधी, स्टेज व प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सर्व शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागातील कर्मचारी, विशेष शिक्षक व समावेशित शिक्षण तज्ज्ञ यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. एनएमबी संस्था अंध मुलांसाठी वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धा दरवर्षी आयोजित करते. या स्पर्धेला गोंदिया तालुक्यातील जीईएस हायस्कूल पांढराबोडी येथील वर्ग नववीचा होमेंद्र पुण्यकुमार नागपुरे या विद्यार्थ्याला पाठविण्यात आले आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठविण्यासाठी पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, गट शिक्षणाधिकारी राजन घरडे, समावेशित शिक्षण तज्ज्ञ राजेश मते, बुद्धभूषण सोनकांबळे यांनी प्रत्यक्ष मुलांना, कर्मचाऱ्यांना व पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन करून त्यांचा उत्साह वाढविला. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. तसेच इतर तालुक्यातील समावेशित शिक्षण तज्ज्ञ वालदे, धावडे, सोनवाने, पटले, खोब्रागडे, राजकुमार गौतम, सिंगनजुडे, रागीट, चव्हाण, विजय ठोकणे, मूलवार यांनी स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)