लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या मालकीच्या गाळ््यांचा फेरलिलाव हा नगर परिषद प्रशासकीय कामकाजाचा एक भाग असून त्यानुसार कारवाई करणे नगर परिषदेला बंधनकारक राहणार असा ठपका ठेवत मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी नगर परिषद गाळ््यांच्या फेर लिलावाच्या प्रस्तावाला बळ देत सर्वच चर्चांना पूर्ण विराम लावला. नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हा महत्त्वपूर्ण हाताळत गाळ््यांच्या फेरलिलावाचा मार्ग मोकळा केला.नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) १७ विषयांना घेऊन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळयांच्या फेरलिलावाचा महत्त्वपूर्ण विषय व त्याला घेऊन येथील काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर सभागृहात काही सदस्यांनीही गाळ््यांच्या फेरलिलावाचा विरोध दर्शविला होता. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५च्या कलम ९२ पोटकलम (३) नुसार गाळ््यांचा फेरलिलाव करण्याची तरतूद आहे. मुख्याधिकारी घुगे यांनी गाळ््यांचा फेरलिलाव हा नगर परिषद कारभाराचा एक भाग असून नगर परिषदेला नियमानुसार फेरलिलाव करणे बंधनकारक असल्याने गाळ््यांचा फेरलिलाव नियमानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले.याशिवाय, शहरातील डुक्कर पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविणे,शासनाकडून प्राप्त होणाºया विविध निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा तयार करणे, नगर परिषद कार्यालयाची जीर्ण इमारत नव्याने बांधणे व प्रस्ताव शासनास सादर करणे, डोंगर तलाव व चावडी तलावाचे बांधकाम-सौंदर्यीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ मधील पाणी टाकी जवळ उद्यान विकास करणे, आदिंसह अन्य कामांना मंजुरी देण्यात आली.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार जमा करणारसभेत काही सदस्यांनी एजंसीच्या माध्यमातून कार्यरत व मागील सात-आठ महिन्यांपासून पगार न मिळालेल्या कर्मचाºयांचा पगार काढून देण्याचा विषय उचलून धरला. यावर मुख्याधिकारी घुगे यांनी कर्मचाऱ्यांचे बँक व ईपीएफ खाते उघडले जात असून आता पगार त्यांच्या खात्यात जमा केला जाणार. थकीत असलेला पूर्ण पगार त्यांच्या खात्यात लवकर जमा केला जाणार असल्याचे सांगितले.नळ कनेक्शन कामावर गोंधळसभेत काही सदस्यांनी नळ कनेक्शन कामातील अनियमिततेला घेऊन चांगलाच गोंधळ घालून प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करण्याची मागणी केली. वृक्षारोपणाच्या विषयावरही गोंधळ झाल्याची माहिती आहे. यावर मुख्याधिकाऱ्यांनी नळ कनेक्शन प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यात अनियमितता असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगीतले.कर्मचाऱ्यांची चिंता कायममुख्याधिकारी घुगे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सभेत सांगितले. विशेष म्हणजे, त्यांच्या आदेशावरून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बँक व ईपीएफ खाते उघडले जात आहेत. मात्र घुगे यांचा कार्यकाळ २८ तारखेला संपत असल्याने ते गेल्यावर काय होणार अशा चिंतेत सर्व कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे उरलेल्या २ दिवसांत त्यांनीच हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.
हा प्रशासकीय कामकाजाचा भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST
नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी (दि.२४) १७ विषयांना घेऊन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळयांच्या फेरलिलावाचा महत्त्वपूर्ण विषय व त्याला घेऊन येथील काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. एवढेच नव्हे तर सभागृहात काही सदस्यांनीही गाळ््यांच्या फेरलिलावाचा विरोध दर्शविला होता.
हा प्रशासकीय कामकाजाचा भाग
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांनी ठेवले नियमावर बोट : गाळ््यांचा फेरलिलाव नियमानुसार होणारच