परसवाडा : तिरोडा तालुक्याच्या परसवाडा येथे हातभट्टी दारू विक्रेते दारू व्यवसाय करीत असल्याने दररोज मद्यसेवनामुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे महिला आपल्या पतीला दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी चक्क गस्त घालत आहेत. परसवाड्यातील महिलांची ही दारूबंदी मोहीम चर्चेचा विषय झाला आहे.महिला दारूबंदी समितीच्या अध्यक्ष मंदा हिंगे, सरपंच सुलक्ष्मी श्यामकुवर व इतर २५ ते ४० महिला दारू विक्रेताच्या घरासमोर दररोज सायंकाळी चौकाचौकात उभ्या राहून दारू पिणाऱ्या व विकणाऱ्यांकडे तिक्ष्ण नजर ठेऊन पाहत असतात. त्यामुळे विक्रेते व पिणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. दारू विक्रेताच्या घरी दारू आढळल्यास दारू जप्त करून पोलिसांना पाचारण केले जाते. पोलिसांच्या स्वाधीन आरोपीला केले जाते. दारू विक्रेते करताच त्यांना दारू विक्रेत्यांच्या हवाली केले जाते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करतात पण कायद्याने त्यांची न्यायलयातून जामीनावर सुटका होते. घरी आल्यावर दारू विक्री पुन्हा सुरू करतात. अनेकांवर कित्येक गुन्हे दाखल असूनही दारू विक्रेते व्यवसाय बंद करण्यास तयार नाही. दारु पिणारेही दारू पिने बंद करण्यास तयार नाही. काही दारू पिणाऱ्यांकडे परवाना असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करता येत नाही. पोलीस स्टेशनला तक्रार येताच बिट हवालदार बिटात गस्तीवर जाऊन दारू विक्रेतेवर गुन्हे ही दाखल करतात व दारूबंदी समितीच्या मदतीने पोलीस स्टेशन आरोपींना अटक केले जाते. परिसरातील पिपरीया, अर्जुनी, खैरलांजी, बघोली व परसवाडा या गावात ही दारूबंद केली आहे. असे दवनीवाडाचे पोलीस निरीक्षक बाकारे यांनी प्रतिनिधीला सांगितले. दारूबंदीसाठी गावात महिलांचा सहभाग व नवयुवक मुलांचा व काही जेष्ठ गावातील नागरिक टी.जे. शहारे, तंटामुक्त अध्यक्ष तिलक भगत, जैयराम, पिंटु मिश्रा, उपसरपंच मनिरात हिंगे, रविंद्र मेश्राम, सुरेश येरणे, टोली अंबुते इतर नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. काही समाजकंटक विक्रेत्यांना प्रोत्साहन करीत असल्याचे, दारूबंदीचे अध्यक्षा मंदा हिंगे, शोभा फुन्ने, सिमा कोटांगले, सकु शेंदरे, सुलक्ष्मी शामकुवर यांनी सांगीतले. दारू विक्री संदर्भात गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
परसवाड्यात दारूबंदीसाठी महिला झाल्या आक्रमक
By admin | Updated: November 15, 2014 22:49 IST