शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

झाशीनगर योजना सुरु होण्यापूर्वीच पंप दुरुस्तीला ?

By admin | Updated: June 5, 2017 00:53 IST

प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रस्तावित झाशीनगर उपसा सिंचन योजनेला तब्बल २१ वर्षे पूर्ण झालीत. योजना अद्याप पूर्णत्वास आली नाही. शेतकऱ्यांच्या शेतात एक थेंब सिंचनासाठी पाणी आले नाही. मात्र तत्पुर्वीच १० वर्षापूर्वी खरेदी केलेले योजनेचे पंप दुरुस्तीला आले आहेत. पंपाची चाचणी आता सुरु आहे. मग १० वर्षापूर्वी पंप खरेदीचे औचित्य हे न उलगडणारे आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी/दर्रे गावाजवळ इटियाडोह प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून झाशीनगर उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. या योजनेचा जब्बारखेडा, येरंडी, पवनी, कोहलगाव, धाबेटेकडी, जांभळी, चुटीया, कान्होली, तिडका, झाशीनगर, येलोडी व रामपूरी या १० गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. १९९६ ते २००२ या कालावधीत प्रकल्पावर अल्प तरतूद असल्याने प्रत्यक्ष कामांना २००२ मध्ये सुरुवात झाली. १९९६ ते २००२ मध्ये अल्प तरतूद असली तरी कामे का झाली नाहीत हे रहस्य आहे. २००२ ते २००८ या कालावधीत वनजमीन मान्यता व प्रत्यक्ष हस्तांतरण न झाल्यामुळे प्रकल्प रेंगाळल्याचे सांगितले जाते. २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कालवे, अंतर्गत रस्ते, पूल आदी कामांना प्राधान्य न देता साहित्य खरेदीची घाई संबंधित विभागाला झाली. ५०० अश्वशक्तीच्या २ व्हर्टीकल टर्बाईन पंपाची खरेदी करण्यात आली. या पंपाद्वारे १३६२ घमी/सेकंद निसर्गाने पाणी ३४-६४ मी. उंचीवर उपसा करुन सिंचनासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेची काम अद्यापही सुरुच आहे. आता त्या पंपाची गरज भासत आहे. २००८ मध्ये खरेदी करुन धूळखात पडले असल्याने त्या पंपांचा वापर करता येणे शक्य नाही. त्यात आणखी काय बिघाड झाला हे अद्याप कळू शकले नाही.कंत्राटदाराला राजकीय वरदहस्तजिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी नवेगावबांध फिडरच्या लोकार्पणाचा सूतोवाच केला होता. प्रारंभी हा लोकार्पण सोहळा २० मे रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र याला प्रशासनाची संमती नव्हती. त्यानंतर २६ मे चा मुहूर्त निघाला. या कार्यक्रमाला ना.शिवतारे यांची वेळ घेण्यात आली होती. प्रशासनाची कसलीच तयारी झाली नाही मात्र लोकार्पणासाठी पालकमंत्र्यांचा अट्टाहास का? हे कोडेच आहे. झाशीनगर उपसा सिंचन योजनेंतर्गत झालेली कामे सुद्धा अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत. कंत्राटदाराला राजकीय वरदहस्त असल्याने तो अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे अधिकारीच दबक्या आवाजात सांगतात. या योजनेच्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.पंपाची जोडणी केली. ते पंप २००६-०७ मध्ये खरेदी केले होते. त्याची आॅईलींग करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात आले. २ ते ४ दिवसात हे पंप येतील. त्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल.अरविंद गेडामकार्यकारी अभियंता