तहसीलसमोर मांडले ठाण : ३३ तलाठी ५ मंडळ अधिकारी सहभागी तिरोडा : महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, विदर्भ पटवारी संघ नागपूर, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या समन्वयातून विविध मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकारी दि. २६ एप्रिल २०१६ पासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची ७/१२, ८ अ, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज प्रकरण अडचणीत आले असून कामे खोळंबलेली आहेत. तालुक्यातील संपूर्ण ३३ तलाठी व ५ मंडळ अधिकारी संपात सहभागी झाल्याने विविध कामे खोळंबलेली आहेत. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. तलाठी साजांची व महसूल मंडळाची पुर्नरचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती योजनेबाबत अशा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय तिरोडा समोर बेमुदत संपात तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी आहेत. या संपात सहभागी झालेल्यांमध्ये मंडळ अधिकारी डी.एस. राऊत, पी.जी.रोकडे, जी.एस.दाते, पी.टी.कोचे, एन.आर.चव्हाण, तलाठी एम.एस. गेडाम, एस.एम.बारसे, जी.बी. हटवार, पी.एस.चाफले, जे.पी. उईके, साबळे, आर.आर. भिवगडे, एन.ए.गोंडाणे, बी.बी.बिसेन, पी.एन. वंजारी, डी.एफ.नागदेवे, आर.एस. मेश्राम, एम.टी.बांगरे, पी.एफ. जाधव, वाय.जी. पटले, एस.व्ही. उईके, एम.टी. मलेवार, डी.एस. नागदेवे, एच.एस.नेवारे, आर.एन. तईकर, पी.एस.शरणागत, एस.पी. जोशी, एन.एम.उगवका, एस.एम. वाकरकर, झेड.जे.नांदणे, पी.ए.मुंढे, वाय.एच.क्षिरसागर यांचा समोवश आहे. (तालुका प्रतिनिधी)
तलाठ्यांच्या संपाने उडाली दाणादाण
By admin | Updated: April 30, 2016 01:40 IST