शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

पालांदूर परिसर पावसासाठी आतूरलेलाच

By admin | Updated: July 21, 2015 01:25 IST

चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग

१७.६ मिमी पावसाची हजेरी : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिलपालांदूर : चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग दाटून आले, गडगडाट सुरु झाला. जोरदार वर्षावाची आस लागली असतानाच आशा निराशेत बदलली. केवळ १७.६ मिमी पावसाची नोंद झाली. काल आठवडी बाजार असतांना पावसाची हजेरी पाहून शेतकऱ्यांसह मजुरांनी काही अंशी समाधान व्यक्त केले. अर्धा तास गर्दी जमली पण पाऊस थांबल्याने जैसे-थे सघडले.पालांदूर परिसरात कृषी विभागाच्या अंदाजानुसार ११७८४.४५ एकूण हेक्टरपैकी प्रत्यक्षात आवत्या १२७७ हेक्टर, रोवणी १२३०, पऱ्हे ९३७.६४ (नर्सरी), तूर ७४१, हळद १९.८, ऊस १९.९०, केळी ६.२०, भाजीपाला २८.३० इतर ४८.४० हेक्टरवर पिकांची लावगड केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळपेरणीस आंरभ झाला असून पावसाने ओढताण दिल्याने पिक संकटात आले आहे. चुलबंध नदीखोऱ्यात स्वतंत्र सिंचन क्षेत्रात ८० टक्के रोवणी आटोपली तर कोरडवाहू शेतीत केवळ १२ टक्के रोवणी उसनवारीवर झाली आहे. नदी, नाले, अजुनही कोरडेच आहेत. खर्चाची मर्यादा अतोनात वाढल्याने धान शेती पाण्याची सुध्दा परवडणारी राहिली नाही. पऱ्हे करपले असून कालचा पाऊस नर्सरीला जीवनदायिनी ठरला आहे. वेळ कमी असल्याने दुबारपेरणी न करता आहे त्यातच उरकवण्याचा विचार शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. ज्या ठिकाणी रोवणी करण्यात आली तिथे भेगा पडल्याने चिखलही कडक झाला आहे. यामुळे धानपिक जसा लावला तश्याच स्थितीत आहे. आता पाऊस आला ही तरी उत्पादनात निम्मा, पुरक अपेक्षीत आहे. मऱ्हेगाव फिडरवर पाणी आहे पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांचा दुष्काळ डोक्यावर असतांना पुढचे नियोजन करने शेतकऱ्याला अवघड झाले आहे. उत्साहपूर्वक शेती कसण्याची मानसिकता उरली नाही. कृषी केंद्रात खते, किटकनाशके पडून आहेत. मागणीच नसल्याने कृषी केंद्रधारकही व्यवसाय कसा राहिल, या विवंचनेत आहेत. उधारीचे प्रमाण वाढून नफयाची टक्केवारी कमी झाली. यामुळे जोडधंदा म्हणून हार्डवेअर, सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा दिसत नाही. परंतू आठवड्याभरात जर पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर रोवणी होणार नाही, असा शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होईल. (वार्ताहर)