शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर पाकीटमारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:28 IST

अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पाकीटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे.

ठळक मुद्देपाकीट फेकतात रेल्वे रूळावर : गाडीत चढतानाच साधली जाते संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पाकीटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे. रेल्वे गाडी फलाटावर थांबताच प्रवासी गाडीत चढण्याच्या तयारीत असताना नेमक्या त्याच वेळी अनेक प्रवाशांच्या पँटच्या मागील खिशातून पाकीट गायब होते. अशा अनेक घटना सांगण्यासाठी प्रवासी रेल्वे पोलीस ठाणे गाठत आहेत.गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर वाढणाºया पाकीटमारीच्या घटनांकडे रेल्वे पोलिसांनी लक्ष देवून पाकीटमारांना पकडणे गरजेचे आहे. गाडीत चढणाºया प्रवाशांचे पाकीट मारले जाते, त्यानंतर त्यातील रूपये काढून काही वेळाने ते पाकीट इतरत्र फेकलेसुद्धा जाते. विशेष म्हणजे रूपये काढून गाडीतील शौचालयाच्या ठिकाणातून रेल्वे रूळावर फेकले जाते. त्यामुळे रेल्वे रूळावर पैसे नसलेले अनेक पाकीटही आढळले आहेत.उल्लेखनीय म्हणजे प्रवाशांच्या पाकिटातील केवळ पैसेच काढून घेतले जातात. मात्र पाकिटात पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड तसेच ठेवल्याचेही आढळले आहेत.तसेच पाकिटात एखाद्याचा संपर्क क्रमांक आढळला तर रेल्वे पोलीस त्या क्रमांकावर संपर्क साधून पाकीट व त्यातील साहित्य त्यांना परत करण्याचे सौजन्य दाखवितात. मात्र पाकीटमारांवर कारवाई होताना किंवा प्रवासी गाडी आल्यावर पाकीटमारांवर किंवा चोरांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस कुठेही दिसत नाही.तीन दिवसांपूर्वीच शासकीय नोकरीत कार्यरत युवकाचे पाकीट गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म-३ वर सायंकाळी पॅसेंजर गाडीत चढताना चोरट्याने लांबविले. गाडीत बसल्यानंतर त्या युवकाला आपल्या खिशात पाकीट नसल्याचे जाणवले. त्यात अडीज हजार रूपये रोख, ड्रायव्हिंग लायसन्स, तीन एटीएम कार्ड आदी साहित्य होते.तर अशाचप्रकारे दुसºया एका घटनेत महिनाभरापूर्वी एका अपडाऊन करणाºया कर्मचाºयाला प्लॅटफॉर्म-३ च्या रेल्वे रूळावर पाकीट पडून असल्याचे आढळले. त्याने ते पाकीट उचलून पोलीस ठाण्यात नेवून दिले. त्या पाकिटात गोंदियातीलच इसमाचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, एटीएम कार्ड आदी साहित्य होते.त्यामुळे पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून पाकीट व आतील साहित्य त्याला परत दिले. सर्व अधिकतर पाकीटमारी प्रकरणात केवळ रोख पैसे काढून इतर साहित्य पाकीटसह फेकून दिले जात असल्याचे समजते. या प्रकाराकडे रेल्वे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.