पुराम यांची मागणी : विष्णू सावरा यांची ग्वाहीसालेकसा : आमगाव विधानसभा क्षेत्रात सालेकसा आणि देवरी तालुक्यात गरीब आदिवासी शेतकरी वर्ग राहात आहे. त्यांच्या धानाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून शासनाच्या वतीने त्वरीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी आ.संजय पुराम यांनी राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.आ. पुराम यांनी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी निवेदन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात हलक्या धानाची कापणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेक शेतकरी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी धान विक्री करीत आहेत. मात्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचे धान खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जात आहे. पडक्या भावाने धान खरेदी करीत आहेत.
धान खरेदी लवकरच सुरू होणार
By admin | Updated: October 21, 2016 01:46 IST