शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील धान भरडाईचा तिढा सुटणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सोडविण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या ...

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सोडविण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने मंगळवारी (दि. ११) मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत धानाच्या भरडाई दरात वाढ आणि धानाचे अपग्रेड करिता १०० रुपये प्रति क्विंटल वाढवून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून पूर्व विदर्भातील धान खरेदीचा तिढा सुटणार आहे.

मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम, खा. प्रफुल्ल पटेल, वित्त विभागाचे अप्पर सचिव, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व्यवस्थापकीय संचालक, अर्थ सल्लागार व उपसचिव, मार्केटिंग फेडरेशनचे सचिव उपस्थित होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत पूर्व विदर्भात हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जात आहे. मागील खरीप हंगामात पूर्व विदर्भात १ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे तांदूळ जमा केला जातो. परंतु खरीप हंगामातील धानाच्या भरडाई दर आणि थकीत वाहतूक भाडे तसेच धानाच्या गुणवत्तेमुळे २०० रुपये प्रति क्विंटल अपग्रेड करुन देण्याची मागणी राईस मिलर्सने केली होती. मात्र शासनाने यावर तीन महिने कुठलाच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे शासकीय धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात १ कोटी क्विंटल धान उघड्यावर व तसेच गोदामांमध्ये पडला आहे. या धानाची उचल न झाल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. याच विषयावर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत धान भरडाईचे दर ४० रुपये प्रति क्विंटल वरुन ५० रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, तसेच मागील खरीप हंगामातील धानाची गुणवत्ता योग्य नसल्याने धान भरडाई करुन नियमानुसार तांदूळ जमा करण्यासाठी प्रति क्विंटल १०० रुपये अपग्रेड वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान खरेदीचा तिढा लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

......

धानाचा बोनस १५ दिवसांत

जिल्हा मार्केटिंग फेडरशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र बोनसची रक्कम अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या विषयावर सुध्दा मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ दिवसांत बोनसची रक्कम देण्याचे आश्वासन खा. प्रफुल्ल पटेल यांना दिले.