शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भातखाचरची कामे प्रगतीपथावर

By admin | Updated: March 4, 2017 00:09 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (२०१६-१७) बोंडगावदेवीची गावाची निवड करण्यात आली आहे.

बोंडगावदेवी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत (२०१६-१७) बोंडगावदेवीची गावाची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लाभप्रद होतील अशी शेतीपयोगी विविध कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतामधील भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतशिवारामध्ये जाऊन भातखाचर कामांची पाहणी केली. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कृषी विभागामार्फत ठिकठिकाणी नाल्यातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात आले. नवनिर्मित बंधाऱ्यांनी ओलीताखालील शेतीचे क्षेत्र वाढले. बंधारा परिसरातील शेतीला जलसिंचनाची सोय उपलब्ध होऊन पिक उत्पादनात वाढ झाली. बंधारा बांधकामामुळे ठिकठिकाणी पाणी अडवून पाण्याच्या संचित साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली. मुबलक पाण्याच्या संचयाने शेतकऱ्यांना विविध पिके घेण्याची संधी प्राप्त झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतशिवार हिरव्यागार अलंकारांनी नटल्याचे चित्र दिसत आहे. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतातील धुऱ्यांवर माती टाकणे, भातखाचर दुरूस्तीचे काम जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत करण्यात येत आहे. गावातील जवळपास ७० शेतकऱ्यांच्या ५० हेक्टर शेतीमध्ये भातखाचराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सदर कामांमुळे शेती समतल होऊन पाणी मुरण्यास सहज शक्य होणार आहे. शेतीच्या बांधावर माती टाकून धुरा (पार) बांधले जात आहे. भातखाचर दुरूस्तीच्या कामांनी शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होऊन नव्याने माती टाकलेल्या धुऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तुर, तिळाचे पिक घेणे सहज शक्य होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरत आहे. येथील शेतशिवारात सुरू असलेल्या भातखाचर दुरूस्तीच्या कामाची पाहणी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक रुषी चांदेवार, कृषी सहायक मसराम यांनी करून शेतकऱ्यांना मौलीक सल्ला सुध्दा दिला. (वार्ताहर)