शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी पुन्हा आले प्राणवायू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

गोंदिया : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल हे सातत्याने प्रयत्नरत ...

गोंदिया : ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये, रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मागील दोन दिवसात त्यांनी दोन्ही जिल्ह्याला लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. त्यानंतर शनिवारी पुन्हा दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १३ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे. हे ऑक्सिजन घेऊन दोन्ही टँकर आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी, ऑक्सिजनची मागणी वाढली आहे; मात्र त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने दोन्ही जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तर रुग्णांचे जीवसुद्धा धोक्यात आले होते. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आयनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली, तसेच दोन्ही जिल्ह्यासाठी नियमित ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यास सांगितलेे होते. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यासाठी प्रत्येकी १३ हजार लिटरचे दोन ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर शनिवारी (दि.२४) नागपूर येथून प्रत्येकी १३ हजार लिटर लिक्विड ऑक़्सिजन घेऊन दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक एक टँकर दाखल झाले. गोंदिया येथे श्याम ट्रेडर्सकडे टँकर क्रमांक एमएच ४० एन ५२४० तर भंडारा येथे सनफ्लेग येथे टँकर क्रमांक एमएच ४०, ७०३२ दाखल झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात निर्माण झालेल्या कोविड परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे लक्ष असून, ते दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे. माजी आ. राजेंद्र जैन हे सुद्धा दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भातील माहिती खा. पटेल यांना देत आहेत.

..........

मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर

अदानी वीज प्रकल्पाचा सीएसआर निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३००० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजन टँक दाखल झाले असून, लवकरच हा प्लांटसुद्धा कार्यान्वित होणार आहे. यामुळे ऑक्सिजनची समस्या पूर्णपणे मार्गी लागणार आहे. याचासुद्धा आढावा सातत्याने खा. प्रफुल्ल पटेल घेत आहेत.