शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईची जबाबदारी मालकाची

By admin | Updated: May 6, 2017 00:54 IST

देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.

ए.एस.जरु दे : कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदेही तयार करण्यात आले आहे, त्यापैकीच एक कायदा कामगार नुकसान भरपाईचा असून या कायदयाअंतर्गत कामाच्या ठिकाणी किंवा कामावर जातांना दुर्घटना झाल्यास पिडीत कामगारास किंवा त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची आहे, असे प्रतिपादन न्या.ए.एस.जरु दे यांनी केले. येथील एसटी आगारात कामगार दिनानिमित्त सोमवारी (दि.१) आयोजीत कायदेविषयक जनजागृती कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून न्या.वासंती मालोदे, आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, आगाराचे कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे व सहायक वाहतूक अधिकारी संजना पटले प्रमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी न्या.मालोदे यांनी, कंत्राटी कामगार अधिनियम १९७० नुसार कामगारांना सर्वप्रकारच्या सुविधा नियोक्त्याने पुरविणे बंधनकारक आहे. या कायद्यांतर्गत जोखमीच्या ठिकाणी १४ वर्षाखालील बालकांना कामावर घेण्यास प्रतिबंध आहे. कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी, कामाचा योग्य मोबदला दिला पाहिजे असे सांगत कामगाराच्या हिताच्या दृष्टीने असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविकातून झाडे यांनी, कोणत्याही कामागारावर अन्याय झाला असेल तर त्याने न्याय मागण्यासाठी न्यायालयात अवश्य जावे. न्यायासाठी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. संचालन करून आभार अ‍ॅड.श्रीमती एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले. कार्यक्र माला एसटी आगारातील अनेक कामगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बस आगारातील सुरेंद्र भिमटे, विठ्ठल राणे, मनिषा धोटे, सुजित डोंगरे, अर्पित वासनिक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील अधीक्षक एस.जी.कान्हे, जी.एस.ठवकर, एस.यु.थोरात, डी.ए.थोरात व आर्यचंद्र गणवीर यांनी सहकार्य केले.