यावर्षी उन्हाळी धान पिकाची परिसरात ७५ टक्के लागवड करण्यात आली आहे. खाजगीरित्या सिंचन सुविधा उपलब्ध करुन पावसाळीपेक्षा उन्हाळी धान पिकाच्या भरवश्यावर आर्थिक स्थिती शेतकरी मजबूत करीत आहेत. उन्हाळी धानपिकाचे चांगले उत्पन्न यावे यासाठी रासायनिक खतासह किटकनाशकांचा वापर मोठ्या प्राणात करीत असतात. मागील आठवड्यापासून एक दोन दिवस गेले की ढगाळ वातावरण निर्माण होत असते. यामुळे उन्हाळी धान पिकावर खोडकिडा आणि करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये दोनदा अवकाळी पावसाने या परिसरात हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवर धान पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळी धानपिकाचा निसवा सुरु आहे. ढगाळ वातावरणामुळे संभाव्य कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भितीने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
रब्बी धान पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST