शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा उद्रेक सुरूच, ग्रामीण भागात संसर्ग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात रविवारी (दि.१८) ५७६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या १३ बाधितांचा मृत्यू झाला. यात खासगी रुग्णालयात ४, तर शासकीय रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ७५९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६०, गोरेगाव २७, आमगाव ५६, सालेकसा ७, देवरी १९, सडक अर्जुनी ७८ व बाहेरील राज्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

ठळक मुद्दे५७६ बाधितांची कोरोनावर मात : ७५९ नवीन रुग्णांची नोंद : १३ बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, बाधितांचे आकडे दररोज नवा रेकार्ड करीत आहे. त्यातच आता शहरीसह ग्रामीण भागात संसर्ग वेगाने वाढत आहे. काही गावच्या गाव कोरोना बाधित होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे, तर आरोग्य यंत्रणा सुध्दा तोकडी पडत असून एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाच आता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.१८) ५७६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली, तर ७५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या १३ बाधितांचा मृत्यू झाला. यात खासगी रुग्णालयात ४, तर शासकीय रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ७५९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ४९८ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६०, गोरेगाव २७, आमगाव ५६, सालेकसा ७, देवरी १९, सडक अर्जुनी ७८ व बाहेरील राज्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावच्या गाव बाधित होत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या आनुषंगाने आतापर्यंत १,२२,७८० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,८६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,१५,८८६ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,०२,५३४ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत २५,६४० कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १८,६३६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६,६५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २,५९६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.  

१ लाख ३० हजार जणांना लस जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३० हजार जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागत आहे.

कोरोनाबाधितांची २६ हजारांकडे वाटचालजिल्ह्यात आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल ९ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा २५,६४० वर पोहचला असून, कोरोनाची २६ हजारी वाटचाल सुरू झाल्याचे चित्र आहे, तर १३० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. आरटीपीसीआर किटची समस्या कायम गोंदिया शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून पाच आरटीपीसीआर केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर आरटीपीसीआर कीटचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना केंद्रावरून परत जावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या