पावसाळ्यातील खरीप हंगामात धान पिकांवर विविध प्रकारचे रोग सतावत असल्यामुळे धान पिकात मोठ्या प्रमाणात तूट आली. पावसाळ्यातील तूट भरुन काढण्यासाठी किंवा धान उत्पन्नाची उणीव भरुन काढण्याच्या दृष्टीने या परिसरातील मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. नुकतीच उन्हाळी हंगामातील धानाची रोवणी आटोपली असून धान पीक हिरवेगार होऊन जोमात येत असतानाच धान पिकावर खोड कीडा व करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून या रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास धान उत्पादनावर मोठा परिणाम होईल या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत. उन्हाळी धान पिकावर लागलेला खोड कीडा व करपा नाहीसा कसा होईल याचे कृषी विभागाने मार्गदर्शन करावे किंवा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी या परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
रब्बीत धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST