शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमची शाळा,आदर्श शाळा स्पर्धा जिल्ह्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:35 IST

अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा, आदर्श शाळा ही स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण होवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देराजा दयानिधी : अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा, आदर्श शाळा ही स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण होवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्यास मदत होणार आहे.त्यामुळे ही स्पर्धा जिल्ह्याभरात राबविण्याचा मानस जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एम.राजा.दयानिधी यांनी व्यक्त केला. आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम २०१७-१८ व २०१८-१९ या नवीन सत्राचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच अदानी प्रकल्पाच्या सभागृहात पार पडला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड,गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत, शिक्षण विस्तार अधिकारी एम.डी.पारधी,अदानी प्रकल्प स्टेशन प्रमुख सी.पी.शाहु,आॅपरेशन अ‍ॅन्ड मेटनन्स प्रमुख समित मिश्रा, नितीन शिराळकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. दयानिधी म्हणाले,अदानी प्रकल्पाने परिसरातील शैक्षणिक विकासासाठी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचाविण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहान देण्याची गरज आहे.अदानी प्रकल्पासारखाच पुढाकार अन्य संस्थांनी घेतल्यास गोंदिया जिल्हा शिक्षणात नक्कीच भरारी घेईल,असा विश्वास व्यक्त केला. शिराळकर यांनी प्रास्ताविकातून अदानी प्रकल्पातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.तसेच आमची शाळा, आदर्श शाळा स्पर्धेमागील उद्देश सांगितला. शाहू यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अदानी फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.या वेळी मागील सत्रातील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या बक्षीस वितरण करण्यात आले.