शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे

By admin | Updated: June 27, 2015 02:22 IST

धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, ...

गोंदिया : धानाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्य सरकारने यावर्षीही बोनस दिला. एवढेच नाही तर दरवर्षी बोनस देऊन तो वाढवून देऊ, असे सांगताना आमचेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नागरा येथील मोहरानटोली मैदानावर भाजप उमेदवारांसाठी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.विजय रहांगडाले, प्रदेश महामंत्री आंबटकर, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोटेकर, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.डॉ.खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, नेतराम कटरे, अशोक इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहेत हे सांगताना अनेक दाखले दिले. इंग्रजांच्या काळापासून ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई म्हणून शासनाची मदत मिळत होती. मात्र पहिल्यांदाच मोदी सरकारने ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्वठन पूर्वी ३ वर्षाकरिता केले जात होते. मात्र आमच्या सरकारने ते ५ वर्षाकरिता करून शेतकऱ्यांना कर्जात दिलासा दिला आहे. घोटाळे करणारे आदीच्या सरकारमधील नेते कोणत्या तोंडाने अच्छे दिन आले का? असा सवाल करतात, असे म्हणून लोकांचे तर अच्छे दिन येणार आहेच पण घोटाळेबाजांसाठी बुरे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना पिक विम्यातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वैयक्तिक पातळीवर नुकसानीची मोजणी करणारी यंत्रणा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गेली पाच वर्षे गोंदिया जिल्हा परिषद भाजपाकडे होती. पण राज्यात आणि केंद्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने सहकार्य केले नाही. पण आता पुन्हा भाजपाकडे जिल्हा परिषद देऊन विकासाची गाडी वेगाने दौडू द्या, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.यावेळी ना.राजकुमार बडोले यांनी निवडणूक आली की बाबासाहेब आठवणाऱ्या पक्षांवर टिका केली. खा.नाना पटोले यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या एका स्थानिक संचालकाकडून व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी खरेदी केंद्रात पोत्यांचा तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला. संचालन दीपक कदम यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)बोनस दरवर्षी सुरू राहावामुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना धान उत्पादकांना दरवर्षी बोनस सुरू राहावा, तसेच बोनसची रक्कम नवीन वर्षात २५० वरून वाढवून द्यावी आणि जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तो धागा पकडत बोनस कायम ठेवण्याची मागणी मान्य केली, मात्र आचारसंहितेमुळे यावर जास्त बोलणार नसल्याचे ते म्हणाले.पुराम दाम्पत्याची अनुपस्थिती खटकणारीआमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम आणि जि.प.सभापती सविता पुराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनुपस्थिती अनेकांना खटकली. जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी-माजी आमदार आणि सभापती हजर असताना पुराम दाम्पत्य का अनुपस्थित होते हे कळू शकले नाही.