शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

आत्तापर्यंतच्या प्रत्येक सरकारने ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार दिलेच नाही. या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहील व कायदेही आमचेच चालतील.

ठळक मुद्देप्रदीप ढोबळे : ओबीसी जनजागृती जनचेतना अभियानाचा समारोप, भव्य मोटारसायकल रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत या प्रवर्गाला मागावसर्गीय असा दर्जा दिला. मात्र आत्तापर्यंतच्या प्रत्येक सरकारने ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार दिलेच नाही. या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न केले. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहील व कायदेही आमचेच चालतील. यापुढे नेतेमंडळी आणि सरकारांने ओबीसींच्या हिताचे बोलल्यास त्यांचेही हित राहिल, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी मांडले.ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्यावतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासून जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप गोंदिया येथे बुधवारी (दि.१९) करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वºहाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे खेमेंद्र कटरे, ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सविता बेदरकर, संभाजी ब्रिगेडचे क्रांती ब्राम्हणकर, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, छावा संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलम हलमारे, अवामे मुस्लीमचे जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्षाचे पुरूषोत्तम मोदी, पुष्पा खोटेले, राजेश चांदेवार, वाय.टी.कटरे, एस. यू. वंजारी, सुनील भरणे उपस्थित होते.प्रदीप ढोबळे म्हणाले, ओबीसी समाज हा भोळा आहे. हा समाज आता जागृत होत आहे. आता या समाजातील नागरिकांना आपले अधिकार कशामुळे मिळू शकले नाही, हे कळले आहे. जेव्हापर्यंत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी समोर येत नाही, तेव्हापर्यंत या समाजाला आपले अधिकार मिळणार नाहीत. ओबीसी प्रवर्ग देशात ६० टक्क्यांच्यावर आहे.आम्ही निवडून देतो त्या प्रतिनिधींनी आणि सरकारने आता ओबीसींचा अंत पाहू नये. आता आंदोलन म्हणजे दानपेटी झाली असून आमच्याकरिता मतदान म्हणजे मंदिर झाले आहे.डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले. संचालन मनोज मेंढे, सुनील पटले यांनी केले तर आभार राजीव ठकरेले यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.शिशीर कटरे, लक्ष्मण नागपुरे, गणेश बरडे, विलास चव्हाण, महेंद्र बिसेन, राजेश नागरीकर, कैलाश भेलावे, पप्पू पटले, सी.पी.बिसेन, विजय फुंडे, आनंदराव कृपाण, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, कमल हटवार, हरीष ब्राम्हणकर, विनायक येडेवार, दिनेश हुकरे, मनोज डोये, मनोज शरणागत,राधेशाम भेंडारकर यांनी सहकार्य केले.आमदारांनी दिले आश्वासनकार्यक्रम स्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधींना आमंत्रित करण्यात आले होते. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण समती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्यापही मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहीणार असून जेव्हा केव्हा ओबीसींच्या मागण्यांचा विषय येईल, तेव्हा मी ओबीसींसोबत असल्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण