शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा मंगळवारी रुग्णालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:13 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचाइशारा : रिक्त पदे भरा वा पर्यायी व्यवस्था करा !

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अधिकारी व जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी (दि.१६) रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच अनिरुद्ध शहारे व रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतीश कोसरकर यांनी पालकमंत्री परिणय फुके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.येथील ग्रामीण रूग्णालयात २६ पदे मंजूर असून प्रत्यक्षात १० कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. एक वैद्यकीय अधिकारी व दोन परिचारिका सध्या रुग्णालयाची आरोग्य सेवा सांभाळत आहेत. औषध निर्माता रजेवर गेल्याने स्वत: वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधांचे वाटप करावे लागत आहे. दररोज ३०० ते ३५० पर्यंत रुग्ण येथे उपचारासाठी येतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्या व उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक गर्दी वाढत आहे. त्या तुलनेत एक वैद्यकीय अधिकारी व दोन अधिपरिचारिकींची सेवा अपुरी पडत आहे.यावर सरपंच शहारे, रुग्ण सेवा कल्याण समितीचे सदस्य कोसरकर व गावकºयांनी जिल्हा शल्य चिकीत्सक, आरोग्य सेवा उपसंचालक, पालकमंत्री डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी, आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे मागणी केली. परंतु त्याला अद्यापही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. रिक्तपदाची पूर्तता किंवा पर्यायी व्यवस्था अजूनही झाली नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा गंभीर रुप धारण करीत आहे. आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांना याचा फटका बसत आहे. एकंदर घटनाक्रम पाहता जिल्हा शल्यचिकीत्सकांसह आरोग्य प्रशासन या प्रश्नावर गंभीर नसल्याचे व या रुग्णालयाच्या समस्या सोडविण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे, असे निवेदनात नमूद आहे.अशात, सोमवारपर्यंत (दि.१५) रिक्त पदे न भरल्यास किंवा पर्यायी व्यवस्था न केल्यास मंगळवारी (दि.१६) ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच शहारे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य कोसरकर व गावकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल