आजी-आजोबा पोरके : निराधार वृद्धांची दिवाळी अंधारातचविजय मानकर सालेकसाऐन दिवाळीच्या पूर्वी आपल्या पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करणारा ४२ वर्षीय मेवा बनाफर याने मुलांवरुन ममतेची सावली हिरावून घेतली. आपल्या वृद्ध आई-वडिलांना पोरके करुन गेला. त्यामुळे मुलगा जय बनाफर याच्या भविष्याच्या वाटेवर अंधारच पसरलेला आहे. सत्तरी गाठणारे वृद्ध आई-वडील पोरके झाले आहेत. पुत्र वियोगात अश्रू वाहत असून दोन्ही म्हाताऱ्यांना आपले दु:ख आवरता आवरेना. अनाथ झालेल्या १३ वर्षीय जय याची दिवाळी अंधारात गेली आहे. तालुक्यातील कोटजमुरा येथील मेवा महावीर बनाफर (४२) याने ३० आॅक्टोबरला रात्री आपली पत्नी रेखा ऊर्फ पार्वती (४२) हिच्या सोबत भांडण करताना तिला यमसदनी पाठविले. एवढेच नाही तर स्वत:ला गळफास लावून स्वत:ही ईहलोकी गेला. त्यांनी हा सगळा प्रकार करीत असताना त्याच्या मुला-मुलीचा तसेच वृद्ध झालेल्या आई-वडिलांचा मुळीच विचार केला नाही. म्हाताऱ्या आई-वडिलांना भीक मागण्यापुरतीत सोडून गेला. मेवा बनाफरची व्यसनाधीनता या प्रकरणाचे मोठे कारण मानले जात आहे. जवळपास १६ वर्षापूर्वी मेवा बनाफर याचा मध्य प्रदेशातील मलाजखंड येथील पार्वती या मुलीशी लग्न झाला होता. काही दिवस व्यवस्थित संसार चालला. परंतु मेवा बनाफर हा कोणी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याने पार्वतीला घटस्फोट दिला. आपल्या प्रेयसीला घेऊन तो नागपूर येथे राहू लागला. त्या दोघांची दोन अपत्ये झाली एक मुलगा आणि एक मुलगी. दुसरीकडे पार्वतीने ही दुसऱ्या पतीसोबत आपला संसार थाटला. आणि तीही एक मुलगी आणि एक मुलाची आई झाली. एवढ्यात मेवा बनाफरला दारू आणि गांजाची सवय लागली. अशात त्याच्या प्रेयसी पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. काही दिवसाने मेवाने तिला सोडले व गावी परतला. परंतु गावी आल्यावर त्याने आपल्या लग्नाची बायको पार्वती ऊर्फ रेखा हिच्याशी फोनवर संपर्क करू लागला. तिचा दुसरा पती नेहमी आजारी राहत असल्यामुळे कदाचित तीही कंटाळली होती. त्यामुळे ती सुद्धा मेवासोबत संपर्क करू लागली. दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. परंतु यात सर्वात मोठी अडचण होती ती पार्वतीच्या दोन मुलांची. तिने मेवासोबत येताना आपल्या मुला-मुलीला सोबत ठेवण्याची अट घातली. मेवाची त्यांना ठेवण्याची मुळीच इच्छा नव्हती. परंतु पार्वतीला प्राप्त करण्यासाठी त्याने मुला-मुलींना ठेवण्यास होकार दिला. काही दिवस सर्व ठीक चालले. परंतु ती मुले मेवाच्या नजरेत खटकत राहिली. अनेक वेळा त्याने मुला-मुलीला तिच्या माहेरी ठेवण्याचा सल्ला दिला, परंतु ती तयार नव्हती. यामुळे दोघांत भांडणं व्हायची. मेवा तिला प्रताडित करीत राहायचा. दारू-गांजा पिण्याची सवय असल्याने घरी नेहमी भांडणे. आर्थिक अडचणसुद्धा निर्माण होत होती. याच दरम्यान पार्वती एका शाळेत स्वयंपाक कामासाठी जायची. त्या पैशातून ती आपल्या लेकरांची गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु मेवा त्या पैशावरसुद्धा डोळा ठेवून राहायचा. त्यामुळेसुद्धा दोघात वाद व्हायचा. शेवटी पत्नीने दोन्ही लेकरांना आपल्या बहिणीच्या घरी नेऊन ठेवले. दोघांची शाळा सुटली आणि शिक्षण अर्धवट सुटले. इकडे दोन्ही पत्नी पुन्हा कोणत्या न कोणत्या कारणाने भांडण करीत होते. बसदेव समाजाचे असून याचा खानदानी व्यवसाय म्हणजे रोज सकाळी उठून ‘जय गंगा’ म्हणत भजन गाऊन घरोघरी भीक मागणे. त्यामुळे मेवाचे वडील आपल्या परंपरेच्या कामात व्यस्त होते. भांडणामुळे पार्वतीसुद्धा आपल्या बहिणीकडे मुला-मुलीसोबत राहू लागले. मेवाने तिला मारहाण करून यमसदनी धाडले.
अनाथ जयच्या वाट्याला ‘अंधार’
By admin | Updated: November 15, 2015 01:15 IST