शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार योजनेसाठी विशेष सभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:57 IST

नगर परिषद सदस्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजनेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.२७) विशेष सभेचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देमुहूर्त मिळाला : नगरसेवकांच्या मागणीची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद सदस्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत नगराध्यक्षांनी भुयारी गटार योजनेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.२७) विशेष सभेचे आयोजन केले आहे. चार विषयांबाबत ही विशेष सभा बोलाविण्यात आली असून यात भुयारी गटार योजनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.१८ जुलै रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. मात्र मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या पारिवारीक कारणामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती. या सभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी भुयारी गटार योजनेचा विषय सूचीत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, तहकूब झालेली १८ तारखेची सभा २५ जुलै रोजी घेण्यात आली होती.मात्र त्यातही विरोधी पक्षातील नगरसेवकांनी भुयारी गटार योजनेचा विषय सभागृहात मांडला जावा अशी मागणी करून चांगलाच गोंधळ घातला होता. या सभेत कामकाज आटोपले होते. मात्र नगरसेवकांच्या मागणीवरून नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी विशेष सभा बोलावून भुयारी गटार योजनेचा विषय मांडणार असे आश्वासन दिले होते.दिलेल्या आश्वासनानुसार, नगराध्यक्ष इंगळे यांनी सोमवारी (दि.२७) विशेष सभा बोलाविली आहे. चार विषयांना घेऊन ही विशेष बोलाविण्यात आली आहे. यात भुयारी गटार योजनेसह कत्तलखान्यासाठी आरक्षीत जागा, सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी आरक्षीत करणे, कृष्णपुरा बगिचा मधील जागा पंपींग स्टेशनसाठी उपलब्ध करणे व स्मशान भूमीकरिता आरक्षीत जागेपैकी दोन एकर जागा सेवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी आरक्षीत करून उपलब्ध करून देणे या विषयांचा समावेश आहे.मात्र भुयारी गटार योजनेला घेऊन नगरसेवकांनी २५ जुलै रोजीच्या सभेत चांगलाच गोंधळ घातला होता. त्यामुळे आता नेमका हाच विषय सभागृहात येणार असल्याने सर्वांच्या नजरा या विषयाकडे लागल्या आहेत. या विषयावर सभेत काय होते हे बघायचे आहे.