आमगाव : पक्षसंघटनेत बूथ कमिटीला महत्त्वाचे स्थान आहे. मजबूत बुथ कमिटी नसेल तर पक्ष संघटन अस्तित्वहीन असते. करिता गावागावांत बूथ कमिटीची स्थापना करून वेळोवेळी सभांचे आयोजन करावे व सभेच्या माध्यमातून गावस्तरावरील प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या समोर ठेवून जनहिताचे प्रश्न सोडवावेत. त्यातून पक्ष बळकटीला चालना मिळेल, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी केले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी यांनी दर महिन्याला कार्यकारिणीची सभा घेण्यात यावी. त्यात गावस्तरावरील कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या जनहिताच्या तसेच पक्षसंघटनेशी संबंधित समस्या एकत्रित करून जिल्हास्तरावर पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे सांगितले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवणकर यांचा तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. संचालन करून आभार तालुका सचिव संतोष श्रीखंडे यांनी मानले. सभेला महिला तालुकाध्यक्ष अंजली बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष कविता रहांगडाले, माजी जि. प. सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, तु़ंडीलाल कटरे, संगीता दोनोडे, उषा हर्षे, माजी पं. स. सदस्य प्रमोद शिवणकर, विनोद कन्नमवार, संतोष श्रीखंडे, सुभाष यावलकर, तिरथ येटरे, जयश्री पुंडकर, देवेंद्र मच्छिरके, संजिव रावत, रवी क्षीरसागर, राजकुमार प्रतापगडे, विनोद बोरकर, जनार्दन शिंगाडे, नीलेश्वरी गौतम, निर्मला बोपचे, संगीता ब्राह्मणकर, कविता बोपचे, शीला चुटे,अनुकला मडावी, रत्नमाला चौरागडे, प्रमिला चकोले, प्रमिला वरमडे, मंगला फुंडे, माया गिर्हेपुंजे, सत्यशीला टेंभरे, सुनील ब्राह्मणकर, नामदेव दोनोडे, लखन भलावी, अशोक नेवारे, लखन चुटे, गोपाल रहिले, ललित ठाकूर, ताराचंद नामुळते, सी. जी. पाऊलझगडे, उदेलाल गौतम, तुळशीराम मेंढे, नरेंद्र शिवणकर, धनलाल मेंढे, श्यामदास बारापात्रे, अशोक बघेले, बबलू बिसेन यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सरपंच-उपसरपंच उपस्थित होते.