शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

निर्माल्यापासून तयार करणार सेंद्रीय खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:28 IST

गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले.

ठळक मुद्देविविध मंडळांकडून गोळा केले निर्माल्य : सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गणेश व दुर्गात्सवादरम्यान गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाने केला होता. यासाठी या विभागाने मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा केले. मंडळाच्या पदाधिकाºयांनी यावर्षी स्वयंस्फुर्तीने निर्माल्य सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वाधिन केले. त्यामुळे या विभागाच्या कार्याला देखील हातभार लावण्यास मदत झाली.राज्यभरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. गोंदिया येथे मागील सहा वर्षांपासून दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फुले, निंबू आदी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते जमिनीत पुरून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरणपूरक जागरूकता दाखवून गोंदिया येथे निर्माल्य रथाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निर्माल्य रथात फूलहार, निंबू, नारळ बूच आदि साहित्य निर्माण रथात अर्पण करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीनगर, कन्हारटोली, पूनाटोली, रेलटोली, इंगळे चौक, गोविंदपूर, गांधी प्रतिमा, मनोहर चौक, चांदणी चौक, मामा चौक, शंकर चौक, वाजपेयी वार्ड, सावराटोली, हेमू कॉलनी चौक, श्री टॉकिज, कुंभारटोली, बजाज वार्ड व इतर दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देवून निर्माल्य जमा करण्यात आले. निर्माल्य रथ दुर्गा उत्सव मंडळासमोर पोहोचताच मंडळातील उत्साही सदस्य त्वरित एकत्र आले.स्वत:हून वाहनापर्यंत निर्माल्य आणून देत सामाजिक वनीकरण विभागाच्या मोहिमेला सहकार्य केले. यावरून शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापासून पर्यावरणपूरक मंडप सजावट करणाºया मंडळाचा सत्कार करण्यात येतो.यावर्षी श्री सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समिती मामा चौक गोंदिया (नानू मुदलियार) व सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ कुंभारटोली मालवीय वार्ड (खोब्रागडे) यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक देण्यात आला. विशेष म्हणजे निर्माल्यापासून तयार होणारे सेंद्रीय खताचे गरजू शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे.निर्माल्य दानातून टाळली पर्यावरणाची हानीपर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दुर्गा उत्सवादरम्यान भाविकांनी वाहिलेले पूजेचे साहित्य, फूल मूर्तीसोबत पाण्यात विसर्जित केल्यास तेथील पाणी प्रदूषित होते. पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, वनविभागाच्या वतीने निर्माल्य रथ फिरविण्यात आला. निर्माल्य रथ शहरात विविध ठिकाणी फिरवून निर्माल्य गोळा करण्यात आले. या कार्यात नर्मदा सेवा संस्थेचे माधव गारसे, स्वामी विवेकानंद हायस्कूल कारंजा येथील हरित सेना प्रभारी शिक्षक कृष्णकांत बिसेन आदींनी पुढाकार घेतला व मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले निर्माल्य रथ अखंड सुरू ठेवले.२९ मंडळांचा पुढाकारगोंदियातील २९ मंडळांकडून निर्माल्य जमा करण्यात आले. यात एक गाडी निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या बंगल्यासमोरील रोपवन क्षेत्रात खड्डा खोदून त्यात टाकण्यात आले. त्यात दुसºया पॉलिथिनही ठेवण्यात आल्या. या खड्ड्यातील निर्माल्याचे कंपोष्ट होवून पुढील हंगामात ते खत रोपे निर्माण करण्याच्या कार्यात उपयोगी येणार आहे, असे सामाजिक वनीकरण अधिकारी युवराज कुंभलकर यांनी सांगितले.