शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:18 IST

कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो.

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : कमीतकमी कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे धोके ओळखून शेतकºयांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांचा शेतात वापर करताना झालेल्या विषबाधेतून काही शेतकºयांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषी केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम. चौरागडे, कृषी उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदिकशोर नायनवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यात भातपीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून काळे म्हणाले, भात पिकावर खोडकिडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते.तसेच निष्काळजीपणे कीटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अनेक जैविक कीटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकºयांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल, असे ते म्हणाले.भात पिकाकरिता विविध कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकिड्याकरिता), मेट्राहायसिअन निसोएमी (तुडतुड्याकरिता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकांचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकिडा नियंत्रणाकरिता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्याातील शेतकºयांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी केले.यावेळी कृषी केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहुल सिंघानिया उपस्थित होते.फवारणीवेळी काळजी घ्याजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर होईल. तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा प्रचार-प्रसार कृषी सहायकांनी करावा. माय पोर्टलवरु न जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज कीटकनाशकांचा वापर शेतकºयांच्या जीवावर बेतला आहे, हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.