शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

सेंद्रिय शेती व स्वयंरोजगार प्रशिक्षण

By admin | Updated: November 26, 2014 23:09 IST

अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका

गोंदिया : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजिवीकेत सुधार घडवून आणण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे शेती कशाप्रकारे केली जाते या विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्राम चिरेखनी येथील ३०, जमुनिया येथील २१ आणि खमारी येथील ३४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सेंंद्रिय शेती, गाईच्या आधारे शेती, गांडुळ खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या औषधी व वस्तु किटनियंत्रके प्रशिक्षण देणे हे होते.सुनिल मानसिंघका समन्वयक गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांनी देशी वंशाच्या गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या विविध औषधी व वस्तु याविषयी माहिती तसेच सुबोधकुमार सिंग, समन्वयक अदानी फाऊंडेशन तिरोडा यांनी सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे स्वयंरोजगार कशाप्रकारे केला जातो. तसेच दिवाकर नेरकर गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार यांनी गाईचे आपल्या जीवनातील महत्व कचरे से कांचन तसेच सतीश राव झारखंड यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्यपरिणाम व जैविक शेतीची आवश्यकता या विषयी योग्य मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना केले.गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र अर्क हे गुणकारी औषध तयार केले जाते. तसेच गोवंशावर आधारित विविध उत्पादने तयार केली जातात. एका गाईचे गोमुत्र दहा एकर जमिनीची फवारणी सहज करुन शकतो. जमिनीतील घज्ञतक विषद्रव्ये संपवून जमीन सजीव करण्याची क्षमता केवळ देशी वंशाच्या गायीच्या शेणात व गोमुत्रातच आहे. एक देशी वंशाची गाय प्रती दिवस ८ ते १० किलो शेण देते. गाईचे शेण व कचऱ्या पासून गांडूळ खत तयार करता येते. एका महिन्यामध्ये ५०० किलो गांडूळ खत तयार होते. बाजारामध्ये गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजेच एका गाईच्या शेणापासून २५०० रुपयाचे उत्पन्न प्रत्येक महिन्याला मिळतो.अदानी फाऊंडेशनचे स्वच्छता अभियानाकडे आर्थिक दृष्टीने पहाणे सुरु केले आहे. संपुर्ण सेंद्रिय कचऱ्यापासून उत्पन्न मिळविले जाऊ शकते. गावामध्ये मुख्यरुपात कचरा कृषी उत्पादन पशुपालन आणि स्वयंपाक घरातुन प्राप्त होतो. या कचऱ्यापासून गांडुळखत बनवून भरपुर प्रमाणात उत्पन्न घेता येते. हा प्रकल्प ५० गावांमध्ये राबविणार आहे.