शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घरचा विरोध पत्करून प्रेमीयुगूल विवाहबंधनात

By admin | Updated: June 11, 2015 00:48 IST

सोमलपूर येथील तंटामुक्त समितीने सज्ञान असलेल्या प्रेमीयुगुलांना पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकवून अखेर ..

तंटामुक्त समितीचा पुढाकार : गावकऱ्यांचे समर्थनबोंडगावदेवी : सोमलपूर येथील तंटामुक्त समितीने सज्ञान असलेल्या प्रेमीयुगुलांना पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकवून अखेर दोन प्रेमवीरांचा लपून-छपून भेटण्याच्या प्रकारावर अखेर पडदा पाडला. त्यांना सुखी संसारासाठी उपस्थित गावकऱ्यांनी आशीर्वाद दिले.सजातीय असलेल्या प्रेमीयुगुलास मुलीच्या वडिलांचा विरोध सहन करावा लागला. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम जडल्याने आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता हाच माझा पती समजून त्या मुलीने दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेमवीराचे घर गाठले. सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिडटोला येथील महेश मुलचंद गजभिये (२५) असे त्या प्रेमवीराचे नाव आहे. झरपडा येथील शैलेजा जयेंद्र मेश्राम (१९) असे प्रेयसीचे नाव आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या प्रेमीयुगुलांना सोमलपूर येथील तंटामुक्त समितीच्या वतीने बिडटोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या बुध्द विहारात गावातील नागरिकांच्या उपस्थितीत मंगल परिणय करून देण्यात आले. बिडटोला येथील महेश गजभिये हा युवक झरपडा येथील आपल्या मावशीकडे नेहमी जाणे-येणे करायचा. तेथे वास्तव्याला असताना तेथील शैलेजासोबत त्याची ओळख झाली. महेशचे वारंवार झरपड्यात जाणे-येणे होत असल्याने त्यांच्या भेटी गाठी झाल्या. सहा महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या त्या दोघांची मैत्री वाढली. भेटी वाढल्या. यापुढे आपण दोघेही एकत्र जीवन जगू असे स्वप्न त्यांनी रंगविले. मुलीच्या प्रेमाची माहिती होताच घरच्यांनी विरोध केला. मुलीने आई-वडिलांच्या विरोधात प्रेमवीराचे घर गाठले. दोघेही सज्ञान असल्याने त्यांनी आम्ही स्वमर्जीने जातीरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यास तयार आहोत. आमचा विवाह करून द्यावा, अशी विनंती तंटामुक्त समितीकडे केली. सोमवारी सकाळी ११ वाजता बिडटोला येथील बुध्द विहारात लग्न लावून देण्यात आले. या वेळी सोमलपूर-बीडटोलाचे तंमुस अध्यक्ष लैलेश्वर खुणे, पोलीस पाटील मेश्राम, पोलीस हवालदार निर्वाण, पोलीस नायक मधू कुरसुंगे, उपसरपंच पांडव मेश्राम, लवा मेश्राम, हरेंद्र खोब्रागडे, मन्साराम मेश्राम, देवदास गणवीर, सुभाष मेश्राम, मुखरू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. परिणय विधी हरेंद्र खोब्रागडे यांनी पार पाडली. (वार्ताहर)