गोंदिया : दिव्यांगबांधव हे समाजाचा महत्वपूर्ण घटक असून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे. दिव्यांगाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. दिव्यांग स्वावलंबन अभियानांतर्गत शनिवारी (दि.३०) सामाजिक न्याय भवनात आयोजित दिव्यांग शिबिरात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अपंग वित्त व विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गजानन वाघ, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा अपंग संघटनेचे कावळे, जयंत शुक्ला उपस्थित होते. शिबिराला सुमारे दोन हजार दिव्यांगबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
दिव्यांगांची सेवा करण्याची संधी-बडोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 00:04 IST