शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:55 IST

निसर्गाने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गावोगावचे तलाव आणि घरेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचा उपयोग करीत पर्यटनाला चालना देण्यासोबतच ...

‘होम स्टे’चे देणार प्रशिक्षण : वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्रे मागविलीगोंदिया : निसर्गाने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गावोगावचे तलाव आणि घरेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचा उपयोग करीत पर्यटनाला चालना देण्यासोबतच वैशिष्ट्यपूर्ण घरांमध्ये पर्यटकांना मुक्कामी राहण्याची संधी देऊन रोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जाणार आहे.जिल्ह्यात प्रदूषण करणाऱ्या उद्योगधंद्यांऐवजी रोजगार वाढीसाठी गोंडी चित्रकला, हस्तशिल्प एम्ब्रॉयडरी वर्क, लाखेच्या बांगड्या तयार करणे, पौष्टिक बिस्किटे, पापड तयार करण्यासोबतच वनौषधी तयार करणे तसेच बीजा लाकडाचे ग्लास तयार करणे इत्यादी व्यवसाय सुरु झाले तर त्यातून रोजगारवाढीला मोठा वाव आहे. याचबरोबर जिल्ह्यातील जंगले, वनौषधी, निसर्ग संपदा, पारंपरिक ग्रामीण जीवन इत्यादीचा विचार केला तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये ग्रामीण पर्यटनाला खूप वाव आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने वैशिष्ट्यपूर्ण घरांची छायाचित्रे स्पर्धा आयोजित केली आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून जे लोक इच्छुक असतील त्यांना सोबत घेऊन ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना त्यांच्या घरी पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था कशी करावी याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.हस्तशिल्प चित्रकला, बिस्कीट तयार करणे, पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था कशी करावी इत्यादी विषयांचे प्रशिक्षण घेण्यास ज्या गावातील व्यक्तींची इच्छा असेल त्यांनी १ मार्चपूर्वी आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे नावे द्यायची आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला १५ मार्चपूर्वी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच आपल्या गावातील इच्छुक व्यक्तींची यादी व आपल्या गावातील सुबक घरांचे मोबाईल छायाचित्र व्हॉट्सअप द्वारे ९०७५२४२३०७ या क्रमांकावर किंवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेलवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या ग्रामीण छायाचित्र स्पर्धेसाठी १ मार्चपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात. योग्य छायाचित्रांना गोंदिया फेस्टीवलमध्ये बक्षिस देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी कळविले आहे. (जिलहा प्रतिनिधी)