शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच पैकी दोनच शिक्षक हजर

By admin | Updated: September 17, 2016 02:13 IST

सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ असून १०३ विद्यार्थी संख्या आहे

पुतळी शाळेतील प्रकार : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ असून १०३ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत मुख्याध्यापकासह पाच शिक्षक कार्यरत असून गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळेला भेट दिली असता पाचपैकी दोनच शिक्षक हजर असल्याचे दिसले. तर तीन नदारद होते.या शाळेचे मुख्याध्यापक जी.के. चौधरी हे मुख्यालयी न राहता ३५ किलोमीटर अंतरावरुन येणे जाणे करतात. त्यामुळे उशिरा येणे लवकर जाणे, तर अनेकदा बुट्टीही मारतात याची भनक गावकऱ्यांना होतीच. त्यामुळे १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व काही गावकऱ्यांनी शाळेला भेट दिली. यात पाचपैकी दोनच शिक्षक हजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या शाळेतील एकही शिक्षक मुख्यालयी राहत नाही. सर्व बाहेरुन येणे-जाणे करतात. यामध्ये मुख्याध्यापक चौधरी वेळेनंतर येणे व वेळेच्या आत जाणे हा प्रकार मागील चार वर्षापासून सुरु आहे. पुतळी हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी या शाळेकडे ढूकंूनही पाहत नाही. याबरोबरच केंद्रप्रमुखाची भूमिका सुद्धा संशयास्पद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकच आपल्या कर्तव्यात कसूर करुन विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करत असेल तर त्यांच्या भविष्याचे काय? असा सवालही पालक वर्गाकडून केला जात आहे.या प्रकरणाची त्वरीत चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही व्हावी अन्यथा गावकरी शाळेला कुलूप ठोकणार अशा आशयाचे निवेदन जि.प. अध्यक्ष, खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सभापती, उपसभापती व या क्षेत्राच्या जि.प. सदस्य सरीता कापगते यांना दिले आहे. (वार्ताहर)